S M L

सोलापूरमध्ये पोलिसांवर दगडफेक 5 पोलीस जखमी

05 मेसोलापूर जिल्ह्यात कुर्डुवाडी, वैराग , बार्शी या परिसरात जबरी चोरी आणि दरोड्याचे चार ते पाच प्रकार घडले होते. 9 लोकांचा एक गट या घटनांमागे असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. माढा तालुक्यातील कुर्डु गावातील पारधी वस्तीतील काही जणांचा यात सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय होता. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी मोठ्या बंदोबस्तासह कुर्डु इथल्या पारधी वस्तीवर छापा टाकला. या दरम्यान पोलीस आणि पारध्यामध्ये संघर्ष झाला. पोलिसांवर दगडफेकचा प्रकार घडला यात 1 पीएसआयसह 5 पोलीस जखमी झाले आहेत. याच वेळी वस्तीतल्या एका झोपडीला आग लागली आणि यात एक चिमूरडी 85 टक्के होरपळली. यामुळे तणाव अधिकच वाढला. या मुलीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि संतप्त पारधी संघटनांनी सदर मुलीचा मृतदेह घेण्यास नकार दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 5, 2011 11:33 AM IST

सोलापूरमध्ये पोलिसांवर दगडफेक 5 पोलीस जखमी

05 मे

सोलापूर जिल्ह्यात कुर्डुवाडी, वैराग , बार्शी या परिसरात जबरी चोरी आणि दरोड्याचे चार ते पाच प्रकार घडले होते. 9 लोकांचा एक गट या घटनांमागे असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. माढा तालुक्यातील कुर्डु गावातील पारधी वस्तीतील काही जणांचा यात सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय होता.

या माहितीच्या आधारावर पोलिसांनी मोठ्या बंदोबस्तासह कुर्डु इथल्या पारधी वस्तीवर छापा टाकला. या दरम्यान पोलीस आणि पारध्यामध्ये संघर्ष झाला. पोलिसांवर दगडफेकचा प्रकार घडला यात 1 पीएसआयसह 5 पोलीस जखमी झाले आहेत. याच वेळी वस्तीतल्या एका झोपडीला आग लागली आणि यात एक चिमूरडी 85 टक्के होरपळली. यामुळे तणाव अधिकच वाढला. या मुलीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि संतप्त पारधी संघटनांनी सदर मुलीचा मृतदेह घेण्यास नकार दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 5, 2011 11:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close