S M L

अंकितावर शिंतोडे, पुरोहितांची माफी

05 मेठाण्यात पाणी पुरीवाल्याचा विकृतपणा उघड करणार्‍या अंकिता राणे या मुलीच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आणि हा प्रकार करणारे आहेत चक्क मुंबई भाजपचे अध्यक्ष राज पुरोहित. एका पुरूषाचं असलं व्हिडिओ शुटिंग करणार्‍या मुलीचं चारित्र्य काय असेल अशा शब्दात राज पुरोहित यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. याहून धक्कादायक प्रकार म्हणजे राज पुरोहित यांनी एका जाहीर सभेत ही मुक्ताफळं उधळली आहेत. दरम्यान आज अंकिता राणे या मुलीनं राज पुरोहित यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच राज पुरोहित यांनी महिलांचा अपमान केल्यानं त्यांना तातडीनं अटक करण्याची मागणी मनसेनं केली. तर पुरोहित यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. अंकिताचं मन दुखवण्याचा आपला काही इरादा नव्हता आणि आपण तसं काही म्हटलं नाही अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 5, 2011 02:52 PM IST

अंकितावर शिंतोडे, पुरोहितांची माफी

05 मे

ठाण्यात पाणी पुरीवाल्याचा विकृतपणा उघड करणार्‍या अंकिता राणे या मुलीच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आणि हा प्रकार करणारे आहेत चक्क मुंबई भाजपचे अध्यक्ष राज पुरोहित. एका पुरूषाचं असलं व्हिडिओ शुटिंग करणार्‍या मुलीचं चारित्र्य काय असेल अशा शब्दात राज पुरोहित यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. याहून धक्कादायक प्रकार म्हणजे राज पुरोहित यांनी एका जाहीर सभेत ही मुक्ताफळं उधळली आहेत.

दरम्यान आज अंकिता राणे या मुलीनं राज पुरोहित यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच राज पुरोहित यांनी महिलांचा अपमान केल्यानं त्यांना तातडीनं अटक करण्याची मागणी मनसेनं केली. तर पुरोहित यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. अंकिताचं मन दुखवण्याचा आपला काही इरादा नव्हता आणि आपण तसं काही म्हटलं नाही अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 5, 2011 02:52 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close