S M L

बेळगावमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या

05 मेबेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील जालीकोप्प या गावात सहा जणांची हत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. यामध्ये ठार झालेल्या पाच महिला आणि एक लहान बालकाचा समावेश आहे तर अन्य सहा जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बेळगावातील के एल ई रूग्णालयात उपचार सुरु आहेत. कर्नाटकातील हुबळी जवळील हक्की पक्की जमातीतील लोक प्रत्येक गावाच्या बाहेर झोपड्या घालुन वास्तव्यास राहतात. बिजापूर जिल्ह्यातील आलमेल गावाचे मुकेश काळे या गावाच्या युवकाचा साक्कुबाई (22) याच्याशी प्रेमसंबंध होते. दोन महिन्यापूर्वी दोघे पळुन गेले होते आणि विवाह केला होता.साक्कुबाई दोन दिवसापूर्वी बेलहोंगल येथे आली होती साक्कुबाईच्या घराच्या मंडळीना मुकेश बरोबरच विवाह मान्य नव्हता त्यामुळे ते साक्कुबाईला मुकेश बरोबर पाठवर नव्हते. याचा राग धरून मुकेश आणि त्याच्या साथीदारानी बुधवारी रात्री झोपड्यांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यात 5 महिला आणि एका सहा महिन्याच्या बालकांचा मृत्यू झाला. तर अन्य सहाजण जखमी आहेत. जखमींवर के एल ई रूग्णालयात उपचार सुरू आहे. मृतांमध्ये साहेब भोसले (55), कांतेरी पवार (30), बकेत पवार (55), सेठू पवार (45) आणि सहा महिण्याचा मुलाचा समावेश आहे. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले की, या प्रकरणातील सर्व आरोपी फरार आहेत. लग्नाला आणि प्रेम विवाहाला विरोध असल्यामुळे ही हत्या घडली आहे. या प्रकरणी बैलहोंगल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 5, 2011 01:19 PM IST

बेळगावमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या

05 मे

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील जालीकोप्प या गावात सहा जणांची हत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. यामध्ये ठार झालेल्या पाच महिला आणि एक लहान बालकाचा समावेश आहे तर अन्य सहा जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बेळगावातील के एल ई रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

कर्नाटकातील हुबळी जवळील हक्की पक्की जमातीतील लोक प्रत्येक गावाच्या बाहेर झोपड्या घालुन वास्तव्यास राहतात. बिजापूर जिल्ह्यातील आलमेल गावाचे मुकेश काळे या गावाच्या युवकाचा साक्कुबाई (22) याच्याशी प्रेमसंबंध होते. दोन महिन्यापूर्वी दोघे पळुन गेले होते आणि विवाह केला होता.

साक्कुबाई दोन दिवसापूर्वी बेलहोंगल येथे आली होती साक्कुबाईच्या घराच्या मंडळीना मुकेश बरोबरच विवाह मान्य नव्हता त्यामुळे ते साक्कुबाईला मुकेश बरोबर पाठवर नव्हते. याचा राग धरून मुकेश आणि त्याच्या साथीदारानी बुधवारी रात्री झोपड्यांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला.

यात 5 महिला आणि एका सहा महिन्याच्या बालकांचा मृत्यू झाला. तर अन्य सहाजण जखमी आहेत. जखमींवर के एल ई रूग्णालयात उपचार सुरू आहे. मृतांमध्ये साहेब भोसले (55), कांतेरी पवार (30), बकेत पवार (55), सेठू पवार (45) आणि सहा महिण्याचा मुलाचा समावेश आहे. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले की, या प्रकरणातील सर्व आरोपी फरार आहेत. लग्नाला आणि प्रेम विवाहाला विरोध असल्यामुळे ही हत्या घडली आहे. या प्रकरणी बैलहोंगल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 5, 2011 01:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close