S M L

पुण्यात हॉस्पिटलच्या आवारात दोन गटात हाणामारी

06 मेपूर्ववैमनस्यातून दोन गटात हॉस्पिटलच्या आवारात तूफान हाणामारी झाल्याची घटना पिपंरी चिंचवड इथं काल रात्री ही घटना घडली आहे. या हाणामारीत दोन जण गंभीर जखमी तर 6 जण किरकोळ जखमी झालेत. या हाणामारीत हॉस्पिटलमधील केबीन,कॉम्प्यूटरचं नूकसान झालंय. पिपंरी चिचंवडच्या मोहन नगर इथं किरकोळ भांडण झाल होतं. यात एक युवक जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी वायसीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. याची कुणकूण लागताच प्रतिस्पर्धी टोळीचे लोक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. उपचार घेत असलेल्या युवकावर या गटाने चॉपर, तलवारीन हल्ला केला. या दरम्यान दुसर्‍या गटाचे लोकही प्रतिकारासाठी पुढे आले. या सर्व घटनेच्या वेळी हॉस्पिटमध्ये केवळ दोन पोलीस उपस्थित होते. पोलिसांनी दोनही गटातील 10 जणांना अटक केली आहे. हॉस्पिटमध्ये पोलीस चौकीचा प्रस्ताव गेल्या दोन वर्षापासून आयुक्तांकडे धूळ खात पडला आहे. या घटनेमुळे हॉस्पिटलच्या आवारातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 6, 2011 11:01 AM IST

पुण्यात हॉस्पिटलच्या आवारात दोन गटात हाणामारी

06 मे

पूर्ववैमनस्यातून दोन गटात हॉस्पिटलच्या आवारात तूफान हाणामारी झाल्याची घटना पिपंरी चिंचवड इथं काल रात्री ही घटना घडली आहे. या हाणामारीत दोन जण गंभीर जखमी तर 6 जण किरकोळ जखमी झालेत. या हाणामारीत हॉस्पिटलमधील केबीन,कॉम्प्यूटरचं नूकसान झालंय.

पिपंरी चिचंवडच्या मोहन नगर इथं किरकोळ भांडण झाल होतं. यात एक युवक जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी वायसीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. याची कुणकूण लागताच प्रतिस्पर्धी टोळीचे लोक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. उपचार घेत असलेल्या युवकावर या गटाने चॉपर, तलवारीन हल्ला केला. या दरम्यान दुसर्‍या गटाचे लोकही प्रतिकारासाठी पुढे आले.

या सर्व घटनेच्या वेळी हॉस्पिटमध्ये केवळ दोन पोलीस उपस्थित होते. पोलिसांनी दोनही गटातील 10 जणांना अटक केली आहे. हॉस्पिटमध्ये पोलीस चौकीचा प्रस्ताव गेल्या दोन वर्षापासून आयुक्तांकडे धूळ खात पडला आहे. या घटनेमुळे हॉस्पिटलच्या आवारातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2011 11:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close