S M L

पुण्यात भीषण आगीत एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

06 मेपुण्यातील गणेश पेठेतल्या बुरुड आळीमध्ये काल गुरूवारी रात्री लागलेल्या आगीमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुदैर्वी मृत्यू झाला आहे. काल रात्री साडेबाराच्या सुमारास बुरुड आळीत राहणार्‍या घोरपडे कुटुंबीयांच्या घरातुन धुराचे लोळ यायला सुरुवात झाल्यानंतर तिथे आग लागली असल्याचे त्यांच्या शेजार्‍यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी या घरातल्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु केले. काही वेळातच फायर ब्रिगेडही इथे दाखल झालं. मात्र अरुंद घर आणि दारातच असणारे लाकडी सामान पेटल्यामुळे त्यांना वाचवायला अडचण येत होती. काही वेळानंतर या सगळ्यांना बाहेर काढण्यात फायर ब्रिगेडला यश मिळालं. मात्र गुदमरल्यामुळे त्यातल्या सहाही जणांचा मृत्यू झाला होता. या घराजवळ बांबू आणि बांबूपासून तयार होणार्‍या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे हा अपघात ओढावला गेला अशी प्रतिक्रिया येथील रहिवाश्यानी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 6, 2011 03:27 PM IST

पुण्यात भीषण आगीत एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

06 मे

पुण्यातील गणेश पेठेतल्या बुरुड आळीमध्ये काल गुरूवारी रात्री लागलेल्या आगीमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुदैर्वी मृत्यू झाला आहे. काल रात्री साडेबाराच्या सुमारास बुरुड आळीत राहणार्‍या घोरपडे कुटुंबीयांच्या घरातुन धुराचे लोळ यायला सुरुवात झाल्यानंतर तिथे आग लागली असल्याचे त्यांच्या शेजार्‍यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी या घरातल्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु केले.

काही वेळातच फायर ब्रिगेडही इथे दाखल झालं. मात्र अरुंद घर आणि दारातच असणारे लाकडी सामान पेटल्यामुळे त्यांना वाचवायला अडचण येत होती. काही वेळानंतर या सगळ्यांना बाहेर काढण्यात फायर ब्रिगेडला यश मिळालं. मात्र गुदमरल्यामुळे त्यातल्या सहाही जणांचा मृत्यू झाला होता. या घराजवळ बांबू आणि बांबूपासून तयार होणार्‍या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे हा अपघात ओढावला गेला अशी प्रतिक्रिया येथील रहिवाश्यानी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2011 03:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close