S M L

अजित पवार, सुप्रिया सुळे यांचा वयाचा विचार करावा -उध्दव ठाकरे

06 मेराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 'मुला-बाळांशी मी असल्या गोष्टी बोलत नाही' या शब्दात उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. शरद पवारांच्या खरमरीत टीकेमुळे चिडलेल्या शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या या विधानाचा समाचार घेतला. अजित पवार, सुप्रिया सुळे यांचं वय काय आहे याचा विचार पवारांनी करावा अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी केली. तसेच ज्या काँग्रेस पक्षासोबत आपली आघाडी आहे त्या पक्षाच्या 'युवराज' राहुल गांधी यांच्या वयाचाही विचार करावा असा टोला हाणला आहे. मी देवाकडे प्रार्थना करतो की देवा त्यांनी सुबुध्दी द्यावी जेणे करून ते याचा विचार करू शकतील. तसेच तरुणांनी आता राष्ट्रवादीबद्दल विचार करावा असं ही उध्दव ठाकरे म्हणाले आहे. उध्दव ठाकरे मुंबईत एका पत्रकार परिषदेनंतर बोलत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 6, 2011 04:20 PM IST

अजित पवार, सुप्रिया सुळे यांचा वयाचा विचार करावा -उध्दव ठाकरे

06 मे

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 'मुला-बाळांशी मी असल्या गोष्टी बोलत नाही' या शब्दात उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. शरद पवारांच्या खरमरीत टीकेमुळे चिडलेल्या शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या या विधानाचा समाचार घेतला. अजित पवार, सुप्रिया सुळे यांचं वय काय आहे याचा विचार पवारांनी करावा अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी केली.

तसेच ज्या काँग्रेस पक्षासोबत आपली आघाडी आहे त्या पक्षाच्या 'युवराज' राहुल गांधी यांच्या वयाचाही विचार करावा असा टोला हाणला आहे. मी देवाकडे प्रार्थना करतो की देवा त्यांनी सुबुध्दी द्यावी जेणे करून ते याचा विचार करू शकतील. तसेच तरुणांनी आता राष्ट्रवादीबद्दल विचार करावा असं ही उध्दव ठाकरे म्हणाले आहे. उध्दव ठाकरे मुंबईत एका पत्रकार परिषदेनंतर बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2011 04:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close