S M L

राम जन्मभूमीप्रकरणी अलाहाबाद कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती

9 मे, दिल्लीअयोद्धेतील वादग्रस्त जागेच्या मालकी हक्कासंदर्भात अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. वादग्रस्त जागेचे त्रिभाजन करण्याच्या अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. त्रिभाजनाची मागणी नसताना हायकोर्टाचा हा निर्णय आश्चर्यकारक असल्याचंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. अलाहाबाद हायकोर्टाने निर्णय देताना या 2.77 एकर जागेचे तीन भागात विभाजन केलं होतं. या निर्णयाविरुद्ध सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा, हिंदु महासभा, रामलल्ला आणि इतर याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय. वादग्रस्त जागेच्या त्रिभाजनामुळे सर्व याचिकाकर्ते असंतुष्ट होते. याचिकाकर्त्यांनी संपूर्ण जागेवर मालकीहक्काचा दावा सांगितला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 9, 2011 07:21 AM IST

राम जन्मभूमीप्रकरणी अलाहाबाद कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती

9 मे, दिल्ली

अयोद्धेतील वादग्रस्त जागेच्या मालकी हक्कासंदर्भात अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. वादग्रस्त जागेचे त्रिभाजन करण्याच्या अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. त्रिभाजनाची मागणी नसताना हायकोर्टाचा हा निर्णय आश्चर्यकारक असल्याचंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

अलाहाबाद हायकोर्टाने निर्णय देताना या 2.77 एकर जागेचे तीन भागात विभाजन केलं होतं. या निर्णयाविरुद्ध सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा, हिंदु महासभा, रामलल्ला आणि इतर याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय. वादग्रस्त जागेच्या त्रिभाजनामुळे सर्व याचिकाकर्ते असंतुष्ट होते. याचिकाकर्त्यांनी संपूर्ण जागेवर मालकीहक्काचा दावा सांगितला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2011 07:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close