S M L

बँकेच्या कर्जबाजारीपणाला सहकार खातेच जबाबदार !

09 मेमहाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता राज्यात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असं राजकारण रंगलंय. काल अजित पवार यांनी याबद्दल सरकारला जबाबदार धरलं होतं. आता ही बँक कर्जबाजारी होण्यामागे राज्याचं सहकार खातं जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. राज्य सरकारनंच कर्जाची हमी दिली होती असं सांगत त्यांनी पुन्हा एकदा एमएससी बँकेच्या संचालकांचा बचाव केला. बँकेवर सहकार खात्याचं नियंत्रण असल्याचं सांगत त्यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. मात्र एसएससी बँकेच्या प्रश्नाचा आघाडी सरकारवर परिणाम होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. एमएससी बँकेसंदर्भात केंद्र सरकारच्या अर्थविभागाशी बोलणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. बँक कर्जबाजारी आहे असं मला सांगण्यात आलं. बँकेत गैरकारभार झाला हे मला माहिती नव्हतं असंही पवार म्हणालेत. दरम्यान आघाडीवर परिणाम होणार नाही असा निर्वाळा पवार यांनी दिला. पण नाबार्ड हे कुणा पक्षाच्या अखत्यारित नसतं याची माहिती एका पक्षाच्या प्रमुखाला नाही याबाबत चिंता वाटते, असं म्हणत त्यांनी माणिकराव ठाकरे यांच्यावर टीका केली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 9, 2011 09:53 AM IST

बँकेच्या कर्जबाजारीपणाला सहकार खातेच जबाबदार !

09 मे

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता राज्यात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असं राजकारण रंगलंय. काल अजित पवार यांनी याबद्दल सरकारला जबाबदार धरलं होतं. आता ही बँक कर्जबाजारी होण्यामागे राज्याचं सहकार खातं जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

राज्य सरकारनंच कर्जाची हमी दिली होती असं सांगत त्यांनी पुन्हा एकदा एमएससी बँकेच्या संचालकांचा बचाव केला. बँकेवर सहकार खात्याचं नियंत्रण असल्याचं सांगत त्यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. मात्र एसएससी बँकेच्या प्रश्नाचा आघाडी सरकारवर परिणाम होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

एमएससी बँकेसंदर्भात केंद्र सरकारच्या अर्थविभागाशी बोलणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. बँक कर्जबाजारी आहे असं मला सांगण्यात आलं. बँकेत गैरकारभार झाला हे मला माहिती नव्हतं असंही पवार म्हणालेत.

दरम्यान आघाडीवर परिणाम होणार नाही असा निर्वाळा पवार यांनी दिला. पण नाबार्ड हे कुणा पक्षाच्या अखत्यारित नसतं याची माहिती एका पक्षाच्या प्रमुखाला नाही याबाबत चिंता वाटते, असं म्हणत त्यांनी माणिकराव ठाकरे यांच्यावर टीका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2011 09:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close