S M L

गडचिरोलीत मेंदूज्वराचं थैमान, 12 जणांचा मृत्यू

10 नोव्हेंबर, गडचिरोलीसतीश त्रिनगरीवारराज्यात अतिसंवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मेंदूज्वरानं थैमान घातलंय. जिल्ह्यात मेंदूज्वरानं 12 रूग्णांचा मृत्यू झालाय तर चार हजारांच्यावर रूग्ण दवाखान्यात उपचार घेत आहेत.दरवर्षी पावसाळयानंतर गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाची मोठ्या प्रमाणावर लागण होते. जंगल क्षेत्रामुळे डासांचं प्रमाणही खूप आहे. मलेरियावर योग्य वेळी उपचार न मिळाल्यानं अनेकांना मेंदूज्वराची लागण झाली आहे. आरोग्य विभागानुसार गेल्या सहा महिन्यात हिवतापाचे सुमारे 8 हजार रूग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्यात मेंदूज्वराचे सुमारे साडेचार हजार रूग्ण आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीमध्ये ज्ञ् 814, धानोरा ज्ञ् 566, भामरागढ - 530, कुरखेडा- 399 आढळून आलेत. त्याचबरोबर अहेरी ज्ञ् 383, कोरची - 239, आरमोरी - 177, तर चामोर्शी ज्ञ् 172 जणांना मेंदूज्वराची लागण झाली आहे. इतर भागांपैकी सिरोंचा ज्ञ् 167, मुलचेरा ज्ञ् 167, गडचिरोली- 103, तर वडसा - 1 एवढे मेंदूज्वराचे रूग्ण आढळून आले आहेत. याबाबत बोलताना गडचिरोलीतील जिल्हा सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आय.जी.नागदेवते म्हणाले की मेंदूज्वराचे रुग्ण वर्षभर आढळत असतात.त्याकरता रुग्णालयात ट्रीटमेंट उपलब्ध आहे. मेंदूज्वरामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने 12 तालुक्यांमधील 3 लाख 24 हजार लोकांच्या रक्तांचे नमुने घेतले आहेत. त्यामुळे आता तरी मेंदूज्वराचं प्रमाण आटोक्यात येण्याची अपेक्षा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 10, 2008 02:23 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2008 02:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close