S M L

वीरेंद्र सेहवाग आयपीएलमधून बाहेर

09 मेआयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सची कामगिरी खराब होतेय त्यातच टीमला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दिल्ली टीमचा कॅप्टन वीरेंद्र सेहवाग दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. खांद्याची दुखापत बळावल्याने सेहवागने हा निर्णय घेतला आहे. त्याला खांद्यावर शस्तक्रिया करावी लागणार असून यासाठी लवकरच तो लंडनला रवाना होणार आहे. यामुळे आयपीएलच्या चौथ्या हंगामातील उरलेल्या मॅचमध्ये सेहवाग खेळू शकणार नाही. आयपीएलमध्ये दिल्लीची टीम 11 मॅच खेळली असून तब्बल 7 पराभवांसह पॉईंटटेबलमध्ये 7 व्या क्रमांकावर आहे. स्पर्धेत दिल्ली टीमच्या आणखी तीन मॅच बाकी असून आता जेम्स होप्स दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कॅप्टन म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 9, 2011 11:09 AM IST

वीरेंद्र सेहवाग आयपीएलमधून बाहेर

09 मे

आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सची कामगिरी खराब होतेय त्यातच टीमला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दिल्ली टीमचा कॅप्टन वीरेंद्र सेहवाग दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. खांद्याची दुखापत बळावल्याने सेहवागने हा निर्णय घेतला आहे.

त्याला खांद्यावर शस्तक्रिया करावी लागणार असून यासाठी लवकरच तो लंडनला रवाना होणार आहे. यामुळे आयपीएलच्या चौथ्या हंगामातील उरलेल्या मॅचमध्ये सेहवाग खेळू शकणार नाही.

आयपीएलमध्ये दिल्लीची टीम 11 मॅच खेळली असून तब्बल 7 पराभवांसह पॉईंटटेबलमध्ये 7 व्या क्रमांकावर आहे. स्पर्धेत दिल्ली टीमच्या आणखी तीन मॅच बाकी असून आता जेम्स होप्स दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कॅप्टन म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2011 11:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close