S M L

दहावी पास व्हा आता मुक्त शाळेतून !

10 मेआर्थिक परिस्थिती किंवा आणखी काही कारणांनी पाचवीनंतर शिक्षण अपूर्ण राहिलेल्या विद्यार्थ्यांना आता मुक्त शाळेच्या माध्यमातून दहावी उत्तीर्ण होता येणार आहे. केंद्र सरकारच्या मुक्तशाळेच्या धर्तीवर राज्यातर्फे ही मुक्त शाळा सुरु कऱण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी पुण्यामध्ये ही माहिती दिली. विशेष म्हणजे या मुक्त शाळेसाठी विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देता येईल या दृष्टीने अभ्यासाची आखणी करण्यात येतेय. सध्या शिक्षण मंडळातर्फे या अभ्यासक्रमाची आखणी करण्यात पंधरा वर्षापेक्षा वयाने अधिक असणार्‍यांसाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. एकूण सहा विषयांची निवड करत त्यांना दहावीची परीक्षा देऊन उत्तीर्ण होणं शक्य होणार आहे. सुतारकाम, नळजोड दुरुस्ती असे अनेक व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम या मुक्त शाळेतून शिकवण्यात येतील.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2011 09:29 AM IST

दहावी पास व्हा आता मुक्त शाळेतून !

10 मे

आर्थिक परिस्थिती किंवा आणखी काही कारणांनी पाचवीनंतर शिक्षण अपूर्ण राहिलेल्या विद्यार्थ्यांना आता मुक्त शाळेच्या माध्यमातून दहावी उत्तीर्ण होता येणार आहे. केंद्र सरकारच्या मुक्तशाळेच्या धर्तीवर राज्यातर्फे ही मुक्त शाळा सुरु कऱण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी पुण्यामध्ये ही माहिती दिली.

विशेष म्हणजे या मुक्त शाळेसाठी विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देता येईल या दृष्टीने अभ्यासाची आखणी करण्यात येतेय. सध्या शिक्षण मंडळातर्फे या अभ्यासक्रमाची आखणी करण्यात पंधरा वर्षापेक्षा वयाने अधिक असणार्‍यांसाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. एकूण सहा विषयांची निवड करत त्यांना दहावीची परीक्षा देऊन उत्तीर्ण होणं शक्य होणार आहे. सुतारकाम, नळजोड दुरुस्ती असे अनेक व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम या मुक्त शाळेतून शिकवण्यात येतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2011 09:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close