S M L

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बरखास्तीची नोटीस

10 मेराज्य सहकारी बँकेपाठोपाठ आता सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके चे भवितव्यही आता धोक्यात आले आहे. नाबार्डने बँकेला बरखास्तीची नोटीस बजावली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना कर्ज दिलं होतं. यात बँकेने एनपीएची तरतूद न करता खोटा नफा दाखवल्याचं नाबार्डनं म्हटलंय. मात्र सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाने बँकेवरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कारवाईपूर्वी लेखापरिक्षण अहवालाचा विचार करायला हवा होता असं संचालक मंडळानं म्हटलंय. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातली ही सगळ्‌यात मोठी बँक आहे. नाबार्डच्या या नोटीशीनंतर सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2011 10:34 AM IST

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बरखास्तीची नोटीस

10 मे

राज्य सहकारी बँकेपाठोपाठ आता सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके चे भवितव्यही आता धोक्यात आले आहे. नाबार्डने बँकेला बरखास्तीची नोटीस बजावली आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना कर्ज दिलं होतं. यात बँकेने एनपीएची तरतूद न करता खोटा नफा दाखवल्याचं नाबार्डनं म्हटलंय. मात्र सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाने बँकेवरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कारवाईपूर्वी लेखापरिक्षण अहवालाचा विचार करायला हवा होता असं संचालक मंडळानं म्हटलंय. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातली ही सगळ्‌यात मोठी बँक आहे. नाबार्डच्या या नोटीशीनंतर सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2011 10:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close