S M L

स्कायवॉकबद्दल नागरिकांमध्ये नाराजी

10 मेमुंबईत रेल्वे स्टेशनच्या बाहेर नागरिकांच्या सोयीसाठी एमएमआरडीएने स्काय वॉक बांधले आहेत. पण करोडो रुपये खर्चून बांधलेल्या या स्कायवॉकबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे. कारण आहे स्कायवॉकची उंची. नागरिकांच्या गरजा विचारात न घेता हे स्कायवॉक बांधल्याचा आरोप महानगरपालिकेनं केला आहे.मुंबईत सर्वाधिक रहदारी आणि गर्दी होते ती रेल्वे स्टेशनच्या बाहेर. त्यामुळे नागरिकांना आणि रहदारीला सोयीस्कर पडेल या दृष्टिकोनातून एमएमआरडीएने मुंबईत आतापर्यंत 35 स्कायवॉक बांधले आहेत. त्यापैकीच सायन रेल्वे स्टेशन बाहेरील स्कायवॉक हा एक आहे. या स्कायवॉकचा वापर करणारे जंबू कुमार टाकळकर यांचं काय म्हणणं आहे की, स्कायवॉकची उंची जास्त आहे त्यामुळे इतक्यावर चढणे असह्य होतं.तर सायनलाच राहणार्‍या सोनुबाई नेटवटे यांना देखील या स्कायवॉकच्या उंचीमुळे, त्रास सहन करावा लागतोय असं मत व्यक्त केलं.रेल्वे स्टेशन बाहेर बांधण्यात आलेल्या 35 स्कायवॉकवर आत्तापर्यंत एमएमआरडीएचे 702 कोटी रुपये खर्च झालेत. कोट्यवधी रुपये खर्च करून हे स्कायवॉक बांधताना एमएमआरडीएनं स्थानिकांना विश्वासात घेतलं नाही असं महानगरपालिका म्हणते. नागरिकांनी भरलेल्या करांमधूनच अशाप्रकारच्या प्रकल्पासाठी निधी उभारला जातो. विकास प्रकल्प कोणताही असो त्यासाठी नागरिकांना विश्वासात घेणं आवश्यक आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2011 12:25 PM IST

स्कायवॉकबद्दल नागरिकांमध्ये नाराजी

10 मे

मुंबईत रेल्वे स्टेशनच्या बाहेर नागरिकांच्या सोयीसाठी एमएमआरडीएने स्काय वॉक बांधले आहेत. पण करोडो रुपये खर्चून बांधलेल्या या स्कायवॉकबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे. कारण आहे स्कायवॉकची उंची. नागरिकांच्या गरजा विचारात न घेता हे स्कायवॉक बांधल्याचा आरोप महानगरपालिकेनं केला आहे.

मुंबईत सर्वाधिक रहदारी आणि गर्दी होते ती रेल्वे स्टेशनच्या बाहेर. त्यामुळे नागरिकांना आणि रहदारीला सोयीस्कर पडेल या दृष्टिकोनातून एमएमआरडीएने मुंबईत आतापर्यंत 35 स्कायवॉक बांधले आहेत. त्यापैकीच सायन रेल्वे स्टेशन बाहेरील स्कायवॉक हा एक आहे.

या स्कायवॉकचा वापर करणारे जंबू कुमार टाकळकर यांचं काय म्हणणं आहे की, स्कायवॉकची उंची जास्त आहे त्यामुळे इतक्यावर चढणे असह्य होतं.तर सायनलाच राहणार्‍या सोनुबाई नेटवटे यांना देखील या स्कायवॉकच्या उंचीमुळे, त्रास सहन करावा लागतोय असं मत व्यक्त केलं.

रेल्वे स्टेशन बाहेर बांधण्यात आलेल्या 35 स्कायवॉकवर आत्तापर्यंत एमएमआरडीएचे 702 कोटी रुपये खर्च झालेत. कोट्यवधी रुपये खर्च करून हे स्कायवॉक बांधताना एमएमआरडीएनं स्थानिकांना विश्वासात घेतलं नाही असं महानगरपालिका म्हणते. नागरिकांनी भरलेल्या करांमधूनच अशाप्रकारच्या प्रकल्पासाठी निधी उभारला जातो. विकास प्रकल्प कोणताही असो त्यासाठी नागरिकांना विश्वासात घेणं आवश्यक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2011 12:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close