S M L

शिखर बँक घोटाळा ; 'दादा' बँकेला ठेंगा !

आशिष जाधव,मुंबई 10 मेतोटा आणि बुडित कर्जाचं प्रमाण वाढल्यामुळे रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेवर आता कारवाई केली. पण बँकेबद्दल नाबार्डचा रिपोर्ट आल्यानंतरच जिल्हा बँका सावध झाल्या. अनेक जिल्हा बँकांनी राज्य बँकेतल्या आपल्या हजारो कोटींच्या ठेवी काढून घेतल्या होत्या, असं आता उघड झालंय. आणि या बँकांमध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या बँकांचाही समावेश आहे.राज्यातल्या सर्व जिल्हा बँकांची शिखर बँक म्हणजे राज्य सहकारी बँक. अडीनडीला मदतीचा हात देणारी बँक म्हणून राज्य बँकेकडे सहकार क्षेत्र बघत असतं. पण गेल्या दोन वर्षांपासून राज्य सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेची कारवाई होईल अशी चर्चा संबंध सहकार क्षेत्रात सुरू होती. त्यातही गेल्या वर्षी जेव्हा 2009 - 10 चा नाबार्ड रिपोर्ट आला आणि संबंध सहकार क्षेत्राचे धाबे दणाणले. जिल्हा बँकांनी तर या दादा बँकेकडे आशेनं बघणं सोडून दिलं. उलट काही हुशार जिल्हा बँकांनी राज्य बँकेतून ठेवी काढायला पद्धतशीरपणे सुरुवात केली. आयबीएन लोकमतच्या हाती लागलेल्या महत्वाच्या कागदपत्रांनुसार. राज्य बँकेतून नोव्हेंबर 2010 मध्ये जवळपास 36 कोटी 29 लाख रुपयांच्या ठेवी जिल्हा बँकांनी काढून घेतल्या. 'दादा' बँकेला ठेंगाअहमदनगर जिल्हा बँक - 6 कोटी 99 लाखपुणे जिल्हा बँक - 10 कोटी 66 लाखसोलापूर जिल्हा बँक - 6 कोटी 5 लाखसांगली जिल्हा बँक - 4 कोटी 2 लाखसातारा जिल्हा बँक - 3 कोटी 36 लाखकोल्हापूर जिल्हा बँक - 2 कोटी 30 लाखनाशिक जिल्हा बँक - 5 कोटी 12 लाखमुंबई जिल्हा बँक - 1 कोटी 6 लाखबीड जिल्हा बँक - 1 कोटी 28 लाखलातूर जिल्हा बँक - 2 कोटी 2 लाखअकोला जिल्हा बँक - 4 कोटी 7 लाख पण गेल्या अर्थसंपकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सहकारी बँकेचा विषय गाजला त्यामुळे या आणि आणखी काही जिल्हा बँकांनी आपल्या ठेवी काढून घेतल्या. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आताच्या घडीला हजारो कोटी रुपयांच्या ठेवी जिल्हा बँकांनी राज्य बँकेतून काढून घेतल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादीच्या ताब्यातल्या जिल्हा बँका आहेत. पण राष्ट्रावादीचे नेते मात्र ही बाब मानायला तयार नाहीत.जिल्हा बँका तर जिल्हा बँका अनेक नागरी बँका आणि संस्थांनी सुद्दा ठेवी काढून घेतल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2011 05:48 PM IST

शिखर बँक घोटाळा ; 'दादा' बँकेला ठेंगा !

आशिष जाधव,मुंबई

10 मे

तोटा आणि बुडित कर्जाचं प्रमाण वाढल्यामुळे रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेवर आता कारवाई केली. पण बँकेबद्दल नाबार्डचा रिपोर्ट आल्यानंतरच जिल्हा बँका सावध झाल्या. अनेक जिल्हा बँकांनी राज्य बँकेतल्या आपल्या हजारो कोटींच्या ठेवी काढून घेतल्या होत्या, असं आता उघड झालंय. आणि या बँकांमध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या बँकांचाही समावेश आहे.

राज्यातल्या सर्व जिल्हा बँकांची शिखर बँक म्हणजे राज्य सहकारी बँक. अडीनडीला मदतीचा हात देणारी बँक म्हणून राज्य बँकेकडे सहकार क्षेत्र बघत असतं. पण गेल्या दोन वर्षांपासून राज्य सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेची कारवाई होईल अशी चर्चा संबंध सहकार क्षेत्रात सुरू होती.

त्यातही गेल्या वर्षी जेव्हा 2009 - 10 चा नाबार्ड रिपोर्ट आला आणि संबंध सहकार क्षेत्राचे धाबे दणाणले. जिल्हा बँकांनी तर या दादा बँकेकडे आशेनं बघणं सोडून दिलं. उलट काही हुशार जिल्हा बँकांनी राज्य बँकेतून ठेवी काढायला पद्धतशीरपणे सुरुवात केली. आयबीएन लोकमतच्या हाती लागलेल्या महत्वाच्या कागदपत्रांनुसार. राज्य बँकेतून नोव्हेंबर 2010 मध्ये जवळपास 36 कोटी 29 लाख रुपयांच्या ठेवी जिल्हा बँकांनी काढून घेतल्या.

'दादा' बँकेला ठेंगा

अहमदनगर जिल्हा बँक - 6 कोटी 99 लाखपुणे जिल्हा बँक - 10 कोटी 66 लाखसोलापूर जिल्हा बँक - 6 कोटी 5 लाखसांगली जिल्हा बँक - 4 कोटी 2 लाखसातारा जिल्हा बँक - 3 कोटी 36 लाखकोल्हापूर जिल्हा बँक - 2 कोटी 30 लाखनाशिक जिल्हा बँक - 5 कोटी 12 लाखमुंबई जिल्हा बँक - 1 कोटी 6 लाखबीड जिल्हा बँक - 1 कोटी 28 लाखलातूर जिल्हा बँक - 2 कोटी 2 लाखअकोला जिल्हा बँक - 4 कोटी 7 लाख

पण गेल्या अर्थसंपकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सहकारी बँकेचा विषय गाजला त्यामुळे या आणि आणखी काही जिल्हा बँकांनी आपल्या ठेवी काढून घेतल्या. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आताच्या घडीला हजारो कोटी रुपयांच्या ठेवी जिल्हा बँकांनी राज्य बँकेतून काढून घेतल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादीच्या ताब्यातल्या जिल्हा बँका आहेत. पण राष्ट्रावादीचे नेते मात्र ही बाब मानायला तयार नाहीत.जिल्हा बँका तर जिल्हा बँका अनेक नागरी बँका आणि संस्थांनी सुद्दा ठेवी काढून घेतल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2011 05:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close