S M L

भोपाळ गॅस प्रकरणी दुरूस्ती याचिका कोर्टाने फेटाळली

11 मेभोपाळ गॅस दुर्घटनेप्रकरणी सीबीआयने दाखल केलेली दुरूस्ती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. पंचवीस वर्षांपूर्वी झालेल्या या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या युनियन कार्बाईडच्या अधिकार्‍यांवर कठोर शिक्षेची मागणी करणारी याचिका सीबीआयने दाखल केली होती. सध्या या अधिकार्‍यांवर फक्त दुर्लक्ष करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पण सीबीआयने या अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा आरोप लावण्यात यावा अशी मागणी केली होती. पण याचिका दाखल करायला उशीर झाल्यामुळे आणि याचिकेत केस पुन्हा उघडण्याविषयी सबळ कारण नसल्यामुळे ही याचिका फेटाळण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2011 09:51 AM IST

भोपाळ गॅस प्रकरणी दुरूस्ती याचिका कोर्टाने फेटाळली

11 मे

भोपाळ गॅस दुर्घटनेप्रकरणी सीबीआयने दाखल केलेली दुरूस्ती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. पंचवीस वर्षांपूर्वी झालेल्या या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या युनियन कार्बाईडच्या अधिकार्‍यांवर कठोर शिक्षेची मागणी करणारी याचिका सीबीआयने दाखल केली होती.

सध्या या अधिकार्‍यांवर फक्त दुर्लक्ष करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पण सीबीआयने या अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा आरोप लावण्यात यावा अशी मागणी केली होती. पण याचिका दाखल करायला उशीर झाल्यामुळे आणि याचिकेत केस पुन्हा उघडण्याविषयी सबळ कारण नसल्यामुळे ही याचिका फेटाळण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2011 09:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close