S M L

जेएनपीटीजवळ भीषण आगीत एकाचा मृत्यू

11 मेमुंबईच्या उरण येथील जेएनपीटीजवळ कंटेनरच्या गोडाऊनमध्ये भीषण आग लागली आहे. दुपारी दोन वाजता न्यु मर्स्क कंटेनर यार्ड या कंपनीत ही आग लागली. मात्र अजूनही ही आग विझलेली नाही. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली होती. पण फायर ब्रिगेडला आग विझवण्यासाठी पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने आगीने पुन्हा पेट घेतला. या गोडाऊनमध्ये ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा आहे. या आगीमध्ये आतापर्यंत एक जणाचा मृत्यू झाला तर 24 जण जखमी झाले आहेत. 24 पैकी 9 गंभीर आहेत. पनवेल, उरण, वाशीच्या हॉस्पिटल मध्ये हवलण्यात आलंय. फायर ब्रिगेडच्या एकूण 25 गाड्या घटना स्थळी दाखल असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2011 05:21 PM IST

जेएनपीटीजवळ भीषण आगीत एकाचा मृत्यू

11 मे

मुंबईच्या उरण येथील जेएनपीटीजवळ कंटेनरच्या गोडाऊनमध्ये भीषण आग लागली आहे. दुपारी दोन वाजता न्यु मर्स्क कंटेनर यार्ड या कंपनीत ही आग लागली. मात्र अजूनही ही आग विझलेली नाही. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली होती. पण फायर ब्रिगेडला आग विझवण्यासाठी पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने आगीने पुन्हा पेट घेतला. या गोडाऊनमध्ये ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा आहे. या आगीमध्ये आतापर्यंत एक जणाचा मृत्यू झाला तर 24 जण जखमी झाले आहेत. 24 पैकी 9 गंभीर आहेत. पनवेल, उरण, वाशीच्या हॉस्पिटल मध्ये हवलण्यात आलंय. फायर ब्रिगेडच्या एकूण 25 गाड्या घटना स्थळी दाखल असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2011 05:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close