S M L

मनोहर जोशींच्या जागी आठवलेंची वर्णी ?

12 मेशिवसेना नेते मनोहर जोशी यांनी राज्यसभा खासदारकीची मुदत पुढील वर्षी संपणार आहे आणि मग त्यांच्या जागी रामदास आठवलेंचे पुनर्वसन होणार असे स्पष्ट संकेत आता मिळत आहे. शिवशक्ती - भीमशक्ती एकत्र आल्यानंतर शिवसेना रामदास आठवलेंना राज्यसभेवर पाठवणार हे युतीमधील एका महत्त्वाच्या नेत्यांनी आयबीएन लोकमतला सांगितलंय. दरम्यान आज 'जनतेच्या मुद्यावर आम्ही एकत्र आलो आहोत' अशी घोषणा गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे आणि रामदास आठवले यांनी आज मुंबईत केली. मात्र ही आमची निवडणुकीसाठीची युती नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. युतीच्या जनआंदोलनाचा भाग म्हणून 9 जूनला मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात या युतीची अधिकृत घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. आम्ही काँग्रेसची साथ सोडली असं ही आठवले यांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 12, 2011 11:42 AM IST

मनोहर जोशींच्या जागी आठवलेंची वर्णी ?

12 मे

शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी राज्यसभा खासदारकीची मुदत पुढील वर्षी संपणार आहे आणि मग त्यांच्या जागी रामदास आठवलेंचे पुनर्वसन होणार असे स्पष्ट संकेत आता मिळत आहे. शिवशक्ती - भीमशक्ती एकत्र आल्यानंतर शिवसेना रामदास आठवलेंना राज्यसभेवर पाठवणार हे युतीमधील एका महत्त्वाच्या नेत्यांनी आयबीएन लोकमतला सांगितलंय.

दरम्यान आज 'जनतेच्या मुद्यावर आम्ही एकत्र आलो आहोत' अशी घोषणा गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे आणि रामदास आठवले यांनी आज मुंबईत केली. मात्र ही आमची निवडणुकीसाठीची युती नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. युतीच्या जनआंदोलनाचा भाग म्हणून 9 जूनला मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात या युतीची अधिकृत घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. आम्ही काँग्रेसची साथ सोडली असं ही आठवले यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2011 11:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close