S M L

आठवलेंनी युतीबरोबर जाऊन चूक करु नये - दलवाई

12 मेरामदास आठवलेंनी युतीबरोबर जाऊन पुन्हा एक चूक करु नये. काँग्रेसकडून काही चूका झाल्या असतील पण त्या मागे टाकत आता आम्ही आरपीआयशी नव्याने चर्चा करायला तयार आहोत. अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना दिली. दरम्यान जनतेच्या मुद्यावर आम्ही एकत्र आलो आहोत' अशी घोषणा गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे आणि रामदास आठवले यांनी आज मुंबईत केली. मात्र ही आमची निवडणुकीसाठीची युती नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय.युतीच्या जनआंदोलनाचा भाग म्हणून 9 जूनला मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात या युतीची अधिकृत घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. आम्ही काँग्रेसची साथ सोडली असं ही आठवले यांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 12, 2011 01:01 PM IST

आठवलेंनी युतीबरोबर जाऊन चूक करु नये - दलवाई

12 मे

रामदास आठवलेंनी युतीबरोबर जाऊन पुन्हा एक चूक करु नये. काँग्रेसकडून काही चूका झाल्या असतील पण त्या मागे टाकत आता आम्ही आरपीआयशी नव्याने चर्चा करायला तयार आहोत. अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना दिली.

दरम्यान जनतेच्या मुद्यावर आम्ही एकत्र आलो आहोत' अशी घोषणा गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे आणि रामदास आठवले यांनी आज मुंबईत केली. मात्र ही आमची निवडणुकीसाठीची युती नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय.युतीच्या जनआंदोलनाचा भाग म्हणून 9 जूनला मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात या युतीची अधिकृत घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. आम्ही काँग्रेसची साथ सोडली असं ही आठवले यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2011 01:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close