S M L

शिखर बँकेच कर्ज थकवलं काँग्रेसच्या नेत्यांनी !

12 मेराज्य सहकारी बँकेनं दिलेले मोठ्या प्रमाणावरचे कर्ज काँग्रेस नेत्यांंच्या संस्थांमुळेच थकलेलं आहे अशी घणाघाती टीका अजित पवार यांनी केली. तसेच काँग्रेस नेत्यांची नावंही घेतली. मुंबईत राष्ट्रावादीच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या नेत्यांवर आगपाखड केली. शिखर बँकेवर झालेल्या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबई बैठक आयोजित करण्यात आली. अजित पवारांनी आपल्या भाषणात थेट काँग्रेसवर हल्ला चढवला. काँग्रेसचे नेते अमरिश पटेल आणि प्रमोद शेंडे यांच्या सूतगिरण्यांनी राज्य बँकेचं कोट्यवधींचं कर्ज बुडवलंय. धुळे जिल्ह्यात काँग्रेसचे नेते अमरिश पटेल यांच्या प्रियदर्शिनी सहकारी सुतगिरणीने राज्य बँकेचे 172 कोटी 12 लाख रुपयाचे कर्ज बुडवलंय असं नाबार्डच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय. पण या सूतगिरणीच्या मालमत्तचे मुल्यांकन 325 कोटी रुपयांचे असून ही मालमत्ता विकून किमान 350 कोटी रुपये बँकेला मिळतील असा दावा राज्य बँकेच्या प्रशासनाने राज्य सरकारकडे केला होता. हीच बाब काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांच्या वर्धा जिल्ह्यातल्या इंदिरा वर्धा सूतगिरणीच्या बाबतीत सांगता येईल. असा खळबळजणक खुलासा अजित पवार यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 12, 2011 02:10 PM IST

शिखर बँकेच कर्ज थकवलं काँग्रेसच्या नेत्यांनी !

12 मे

राज्य सहकारी बँकेनं दिलेले मोठ्या प्रमाणावरचे कर्ज काँग्रेस नेत्यांंच्या संस्थांमुळेच थकलेलं आहे अशी घणाघाती टीका अजित पवार यांनी केली. तसेच काँग्रेस नेत्यांची नावंही घेतली. मुंबईत राष्ट्रावादीच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या नेत्यांवर आगपाखड केली.

शिखर बँकेवर झालेल्या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबई बैठक आयोजित करण्यात आली. अजित पवारांनी आपल्या भाषणात थेट काँग्रेसवर हल्ला चढवला. काँग्रेसचे नेते अमरिश पटेल आणि प्रमोद शेंडे यांच्या सूतगिरण्यांनी राज्य बँकेचं कोट्यवधींचं कर्ज बुडवलंय. धुळे जिल्ह्यात काँग्रेसचे नेते अमरिश पटेल यांच्या प्रियदर्शिनी सहकारी सुतगिरणीने राज्य बँकेचे 172 कोटी 12 लाख रुपयाचे कर्ज बुडवलंय असं नाबार्डच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय. पण या सूतगिरणीच्या मालमत्तचे मुल्यांकन 325 कोटी रुपयांचे असून ही मालमत्ता विकून किमान 350 कोटी रुपये बँकेला मिळतील असा दावा राज्य बँकेच्या प्रशासनाने राज्य सरकारकडे केला होता. हीच बाब काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांच्या वर्धा जिल्ह्यातल्या इंदिरा वर्धा सूतगिरणीच्या बाबतीत सांगता येईल. असा खळबळजणक खुलासा अजित पवार यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2011 02:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close