S M L

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा जल्लोष सुरू

12 मेपश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पाँडिचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे. पण पोस्ट पोल सर्व्हेत पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचा किल्ला कोसळणार असं स्पष्ट झाल्याने तिथं आतापासूनच जल्लोष सुरू झाला आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या घराबाहेरचं वातावरण उत्सवमय झालं आहे. मोठी उत्कंठा लागलेल्या निवडणुकीच्या निकालासाठी आता केवळ काही तास उरले आहेत. सर्वाधिक लक्ष आहे ते पश्चिम बंगालकडे. सध्या कोलकात्यातील सर्व रस्ते कालीघाटमधल्या गल्लीत जाताना दिसतायत जिथं तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी राहतात.ममता बॅनजीर्ंच्या घराबाहेर समर्थकांनी फुलं आणि मिठाई घेऊन आतापासूनच गर्दी केली आहे. तर त्यांच्या ऑफिसमध्ये पक्षांच्या नेत्याची रीघ लागली आहे. ऑफिसमधल्या खुर्च्यांनाही तृणमूलच्या झेंड्याचा रंग देण्यात आला आहे.ममता बॅनजीर्ंच्या घराबाहेरच्या पत्रकारांच्या गराड्यात हा 28 वर्षांचा विश्वजीतसुद्धा आहे. ममता बॅनजीर्ंना पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहण्यासाठी तो आपल्या पत्नीसह सुंदरबनहून आला. तो म्हणतो ममताजींना पाहून मला खूप आनंद होईल. इतके पत्रकार मी आयुष्यात यापूर्वी कधीच पाहिले नव्हते.सर्व जगाचं लक्ष्य ममता दीदींवर आहे. ममतांनी निर्माण केलेल्या वादळात जगातील सर्वात जुनं कम्युनिस्ट लोकशाहीचे सरकार कोसळणार असे संकेत पोस्ट पोल सर्व्हेत मिळालेत. तर आंतरराष्ट्रीय मीडियासाठी हा महत्त्वाचा प्रसंग आहे. फ्रान्स, अमेरिका तसेच इंग्लंडहून रिपोर्टर्स इथं येत आहे.पण तृणमूलच्या प्रमुख सध्या मीडियाशी बोलायचं टाळत आहे. त्याऐवजी निकालाला सामोरं जाण्यासाठी त्यांनी आपलं मन संगीत आणि पेंटिंगमध्ये गुंतवलंय. पश्चिम बंगालमधला डाव्यांचा बालेकिल्ला उद्धवस्त करून ममतादीदी इतिहास निर्माण करतात की आश्चर्यकारक विजय मिळवून डावे धक्का देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 12, 2011 05:57 PM IST

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा जल्लोष सुरू

12 मे

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पाँडिचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे. पण पोस्ट पोल सर्व्हेत पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचा किल्ला कोसळणार असं स्पष्ट झाल्याने तिथं आतापासूनच जल्लोष सुरू झाला आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या घराबाहेरचं वातावरण उत्सवमय झालं आहे.

मोठी उत्कंठा लागलेल्या निवडणुकीच्या निकालासाठी आता केवळ काही तास उरले आहेत. सर्वाधिक लक्ष आहे ते पश्चिम बंगालकडे. सध्या कोलकात्यातील सर्व रस्ते कालीघाटमधल्या गल्लीत जाताना दिसतायत जिथं तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी राहतात.ममता बॅनजीर्ंच्या घराबाहेर समर्थकांनी फुलं आणि मिठाई घेऊन आतापासूनच गर्दी केली आहे. तर त्यांच्या ऑफिसमध्ये पक्षांच्या नेत्याची रीघ लागली आहे. ऑफिसमधल्या खुर्च्यांनाही तृणमूलच्या झेंड्याचा रंग देण्यात आला आहे.

ममता बॅनजीर्ंच्या घराबाहेरच्या पत्रकारांच्या गराड्यात हा 28 वर्षांचा विश्वजीतसुद्धा आहे. ममता बॅनजीर्ंना पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहण्यासाठी तो आपल्या पत्नीसह सुंदरबनहून आला. तो म्हणतो ममताजींना पाहून मला खूप आनंद होईल. इतके पत्रकार मी आयुष्यात यापूर्वी कधीच पाहिले नव्हते.

सर्व जगाचं लक्ष्य ममता दीदींवर आहे. ममतांनी निर्माण केलेल्या वादळात जगातील सर्वात जुनं कम्युनिस्ट लोकशाहीचे सरकार कोसळणार असे संकेत पोस्ट पोल सर्व्हेत मिळालेत. तर आंतरराष्ट्रीय मीडियासाठी हा महत्त्वाचा प्रसंग आहे. फ्रान्स, अमेरिका तसेच इंग्लंडहून रिपोर्टर्स इथं येत आहे.

पण तृणमूलच्या प्रमुख सध्या मीडियाशी बोलायचं टाळत आहे. त्याऐवजी निकालाला सामोरं जाण्यासाठी त्यांनी आपलं मन संगीत आणि पेंटिंगमध्ये गुंतवलंय. पश्चिम बंगालमधला डाव्यांचा बालेकिल्ला उद्धवस्त करून ममतादीदी इतिहास निर्माण करतात की आश्चर्यकारक विजय मिळवून डावे धक्का देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2011 05:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close