S M L

शिखर बँकेचा धस्का ; जळगाव बँकेचा आर्थिक खुलासा

13 मेसध्या राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहारांचा मुद्दा चांगलाच गाजतोय. त्यातच राज्यातील कोणत्या सहकारी संस्थांनी राज्य बँकेची रक्कम बुडवली किंवा थकवली त्यांची नावं पुढे येऊ लागली आहेत. त्यातच आज जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेने तातडीने पत्रकार परिषद घेत बँकेची आर्थिक स्थिती व्यवस्थित असल्याचा खुलासा केला. विशेष म्हणजे ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वात आहे. सध्या बँकेकडे 45 कोटी रुपयांचे थकित कर्ज आहे. त्यासाठी सरकारने ही हमी घेतली होती. त्याबाबत सरकार दरबारी वारंवार पाठपुरावा करुनही, मुख्यमंत्री, सहकारमंत्री यांच्याकडून ठोस उत्तर मिळत नसल्याचा आरोप बँकेने केला आहे. दरम्यान, बँकेचा एनपीए 28 टक्क्यांवरून 21 टक्क्यांवर आल्याचे सांगण्यात आलं. तसेच थकित कर्ज वसूल करण्यासाठी बँकेने एक साखर कारखाना आणि एक सूतगिरणी विकलीदेखील आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2011 02:15 PM IST

शिखर बँकेचा धस्का ; जळगाव बँकेचा आर्थिक खुलासा

13 मे

सध्या राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहारांचा मुद्दा चांगलाच गाजतोय. त्यातच राज्यातील कोणत्या सहकारी संस्थांनी राज्य बँकेची रक्कम बुडवली किंवा थकवली त्यांची नावं पुढे येऊ लागली आहेत. त्यातच आज जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेने तातडीने पत्रकार परिषद घेत बँकेची आर्थिक स्थिती व्यवस्थित असल्याचा खुलासा केला.

विशेष म्हणजे ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वात आहे. सध्या बँकेकडे 45 कोटी रुपयांचे थकित कर्ज आहे. त्यासाठी सरकारने ही हमी घेतली होती. त्याबाबत सरकार दरबारी वारंवार पाठपुरावा करुनही, मुख्यमंत्री, सहकारमंत्री यांच्याकडून ठोस उत्तर मिळत नसल्याचा आरोप बँकेने केला आहे. दरम्यान, बँकेचा एनपीए 28 टक्क्यांवरून 21 टक्क्यांवर आल्याचे सांगण्यात आलं. तसेच थकित कर्ज वसूल करण्यासाठी बँकेने एक साखर कारखाना आणि एक सूतगिरणी विकलीदेखील आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 13, 2011 02:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close