S M L

महिलांचे प्रश्न मांडणारी जम्मूची गोशिया

10 नोव्हेंबर, जम्मू काश्मीर सहा राज्यात निवडणुकांचे वारे वाहायला लागले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा येत्या 17 तारखेला निवडणूक होतेय. या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी भाग घेतलाय. पण स्त्रियांचं शोषण थांबवण्याच्या हेतूनं निवडणुकीत उभी राहिलेली 25 वर्षांची गोशिया सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. गोशिया इस्लाम मतांसाठी कित्येक मैलांचा प्रवास करते. गोशियाच्या म्हण्यानुसार जेव्हा तिला न्यायाची गरज होती, तेव्हा मात्र तिच्याकडं कोणीचं फिरकलं नाही. पण तिनं मात्र आपल्या इतर शोषित स्त्रियांच्या मागे खंबीरपणं उभं राहण्याचा निर्णय घेतला. ' या भागातल्या अनेक मुलींचं शोषण होतंय. मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी अशा शोषित मुलींची लिस्टचं बनवलीय. आम्ही लवकरच ती लिस्ट राज्यपालांकडे सोपवणार आहोत ', असं गोशिया सांगत होती. बंदीपोरमध्ये येत्या 17 तारखेला निवडणूक होणार आहे. राज्यशास्त्राची विद्यार्थिनी असलेल्या गोशियानं स्त्रियांच्या प्रश्नाला हात घातल्यामुळे ती लोकांचं लक्ष वेधून घ्यायला यशस्वी ठरली आहे. ' स्त्रियाचं स्त्रियांचे प्रश्न समजून घेतात. आधीच्या आमदारांनी आमची काहीच मदत केली नाही. निदान ती आम्हाला समजून तरी घेते ',असं एक महिला गाशियाबद्दल सांगत होती. गोशियानं स्वत:च्या गरीब नवाज पक्षाची स्थापना केली आहे पण ती वीज, पाणी तसंच रस्त्यांच्या प्रश्नावर बोलत नाही, तर ती भ्रष्टाचार आणि दहशतवाद संपवायची भाषा करते.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 10, 2008 05:48 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2008 05:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close