S M L

केरळमध्ये परंपरेप्रमाणे सत्ताबदल

13 मेकेरळमध्ये काँग्रेसप्रणित आघाडीला बहुमत मिळाले आहे. पण लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या जागा पाहता, काँग्रेसची मतं कमी झाली आहे. केवळ तीन मतांनी डाव्या आघाडीचं बहुमत हुकलं असलं. तरी सरकार स्थापन करण्यासाठी आपण प्रयत्न करणार नाही असं म्हणत मावळते मुख्यमंत्री अच्युतानंदन यांनी हार कबूल केली. पण या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरला तो मुस्लिम, हिंदू आणि ख्रिश्चन मतांच्या ध्रुवीकरणाचा. केरळमध्ये भाजपने 138 जागा लढवल्या होत्या. पण त्यांना एकाही जागे वर विजय मिळाला नाही. विरोधकांना सत्तेत बसवण्याची तीस वर्षांची परंपरा केरळने यंदाही राखली. पाच वर्ष विरोधात बसलेल्या काँग्रेस आघाडीला 2 मतांचं का होईना. पण बहुमत मिळालंय. 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत केरळमध्ये वीसपैकी सोळा जागा मिळाल्यानंतर काँग्रेसला घवघवीत यशाची अपेक्षा होती. म्हणूनच सत्ता आली तरी जनाधार कमी झाल्याची बाब काँग्रेसला खुपतेय. मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार ओमान चांडी यांनी तसं बोलूनही दाखवलं. डाव्या आघाडीचे मावळते मुख्यमंत्री व्ही एस अच्युतानंदन यांच्या कामावर लोक समाधानी होते, असं आयबीएन नेटवर्कच्या सर्व्हेत दिसून आलं. पण अच्युतानंदन आणि त्यांच्याच पक्षात अनेक मतभेद निवडणुकीच्या निकालांमध्येही प्रतिबिंबित होत आहे. सत्ता केवळ तीन आकडे दूर असली, तरी फोडाफोडीचं राजकारण करण्यापेक्षा पराजय स्वीकारत डाव्यांनी विरोधात बसण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेससोबत असलेल्या मुस्लिम लीगला 20 जागा मिळाल्या. मुस्लिम मतांचे एवढं ध्रुवीकरण झालं नसतं तर कदाचित काँग्रेसला विरोधात बसावे लागले असते. माकपचे मुख्यमंत्री व्ही एस अच्युतानंदन यांनी काही कट्टर इस्लामिक संस्थांना विरोध केल्यामुळे हिंदूंची मतं माकपच्या मागे एकवटली. असाही निष्कर्ष अनेक जागांच्या निकालावरून काढता येईल.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2011 05:46 PM IST

केरळमध्ये परंपरेप्रमाणे सत्ताबदल

13 मे

केरळमध्ये काँग्रेसप्रणित आघाडीला बहुमत मिळाले आहे. पण लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या जागा पाहता, काँग्रेसची मतं कमी झाली आहे. केवळ तीन मतांनी डाव्या आघाडीचं बहुमत हुकलं असलं. तरी सरकार स्थापन करण्यासाठी आपण प्रयत्न करणार नाही असं म्हणत मावळते मुख्यमंत्री अच्युतानंदन यांनी हार कबूल केली. पण या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरला तो मुस्लिम, हिंदू आणि ख्रिश्चन मतांच्या ध्रुवीकरणाचा. केरळमध्ये भाजपने 138 जागा लढवल्या होत्या. पण त्यांना एकाही जागे वर विजय मिळाला नाही.

विरोधकांना सत्तेत बसवण्याची तीस वर्षांची परंपरा केरळने यंदाही राखली. पाच वर्ष विरोधात बसलेल्या काँग्रेस आघाडीला 2 मतांचं का होईना. पण बहुमत मिळालंय. 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत केरळमध्ये वीसपैकी सोळा जागा मिळाल्यानंतर काँग्रेसला घवघवीत यशाची अपेक्षा होती. म्हणूनच सत्ता आली तरी जनाधार कमी झाल्याची बाब काँग्रेसला खुपतेय. मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार ओमान चांडी यांनी तसं बोलूनही दाखवलं.

डाव्या आघाडीचे मावळते मुख्यमंत्री व्ही एस अच्युतानंदन यांच्या कामावर लोक समाधानी होते, असं आयबीएन नेटवर्कच्या सर्व्हेत दिसून आलं. पण अच्युतानंदन आणि त्यांच्याच पक्षात अनेक मतभेद निवडणुकीच्या निकालांमध्येही प्रतिबिंबित होत आहे. सत्ता केवळ तीन आकडे दूर असली, तरी फोडाफोडीचं राजकारण करण्यापेक्षा पराजय स्वीकारत डाव्यांनी विरोधात बसण्याचा निर्णय घेतला.

या निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेससोबत असलेल्या मुस्लिम लीगला 20 जागा मिळाल्या. मुस्लिम मतांचे एवढं ध्रुवीकरण झालं नसतं तर कदाचित काँग्रेसला विरोधात बसावे लागले असते. माकपचे मुख्यमंत्री व्ही एस अच्युतानंदन यांनी काही कट्टर इस्लामिक संस्थांना विरोध केल्यामुळे हिंदूंची मतं माकपच्या मागे एकवटली. असाही निष्कर्ष अनेक जागांच्या निकालावरून काढता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 13, 2011 05:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close