S M L

तामिळनाडूत 'जय'ललिता ; करूणानिधींना धक्का

13 मेतामिळनाडूमध्ये जयललितांच्या अण्णा द्रमुकने करुणानिधी यांच्या द्रमुकचा सफाया केला. गेली दोन टर्म सत्ता उपभोगणार्‍या करुणानिधींना मात्र यावेळी सत्तेतून पायउतार व्हावे लागले. द्रमुकला घराणेशाहीच्या राजकारणाचा फटका तर बसलाच पण 2 जी स्पेक्ट्रम घोटाळाही त्यांना भोवला असंच आता म्हणावे लागेल.अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाक्यांची आतिषबाजी. तब्बल दहा वर्षांनंतर जयललिता यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षानं पुन्हा एकदा तामिळनाडूत वर्चस्व मिळवल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर होता. तामिळनाडूमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार आणि द्रमुकमध्ये वाढलेली घराणेशाही याला कंटाळून अखेर मतदारांनी जयललिता यांचा पर्याय स्वीकारला आणि त्यांना भरघोस जागांनी सत्तास्थानी बसवलं.द्रमुकच्या राजकारणाला तिथली जनता कंटाळली होती. असंच आजच्या निकालावरून दिसून येतंय. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी द्रमुकच्या मतांची टक्केवारी केवळ एक टक्क्याने घसरली. पण आता मतदारांनी आपल्याला विश्रांतीचा सल्ला दिल्याचा करुणानिधी सांगतात.द्रमुकबरोबर आघाडी करत काँग्रेसने गेल्या तुलनेत या निवडणुकीत स्वतःच्या पदरपात अधिकच्या जागा पाडून घेतल्या. पण निकालानंतरची स्थिती पाहिली तर, द्रमुकसोबत आघाडी करुन काँग्रेसला फारसा फायदा झाला असं दिसत नाही. तसं त्यांचे नेतेही बोलून दाखवताहेत. पण या निकालामुळे यूपीएवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही असं यूपीएतील घटक पक्ष म्हणत आहेत.तामिळनाडूच्या जनतेनं पुन्हा एकदा जयललिता यांच्याकडे सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत. पण आगामी पाच वर्षात मात्र द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन पक्षातील राजकीय युद्ध चांगलंच रंगणार यात अजिबात शंका नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2011 06:00 PM IST

तामिळनाडूत 'जय'ललिता ; करूणानिधींना धक्का

13 मे

तामिळनाडूमध्ये जयललितांच्या अण्णा द्रमुकने करुणानिधी यांच्या द्रमुकचा सफाया केला. गेली दोन टर्म सत्ता उपभोगणार्‍या करुणानिधींना मात्र यावेळी सत्तेतून पायउतार व्हावे लागले. द्रमुकला घराणेशाहीच्या राजकारणाचा फटका तर बसलाच पण 2 जी स्पेक्ट्रम घोटाळाही त्यांना भोवला असंच आता म्हणावे लागेल.

अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाक्यांची आतिषबाजी. तब्बल दहा वर्षांनंतर जयललिता यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षानं पुन्हा एकदा तामिळनाडूत वर्चस्व मिळवल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर होता. तामिळनाडूमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार आणि द्रमुकमध्ये वाढलेली घराणेशाही याला कंटाळून अखेर मतदारांनी जयललिता यांचा पर्याय स्वीकारला आणि त्यांना भरघोस जागांनी सत्तास्थानी बसवलं.

द्रमुकच्या राजकारणाला तिथली जनता कंटाळली होती. असंच आजच्या निकालावरून दिसून येतंय. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी द्रमुकच्या मतांची टक्केवारी केवळ एक टक्क्याने घसरली. पण आता मतदारांनी आपल्याला विश्रांतीचा सल्ला दिल्याचा करुणानिधी सांगतात.

द्रमुकबरोबर आघाडी करत काँग्रेसने गेल्या तुलनेत या निवडणुकीत स्वतःच्या पदरपात अधिकच्या जागा पाडून घेतल्या. पण निकालानंतरची स्थिती पाहिली तर, द्रमुकसोबत आघाडी करुन काँग्रेसला फारसा फायदा झाला असं दिसत नाही. तसं त्यांचे नेतेही बोलून दाखवताहेत. पण या निकालामुळे यूपीएवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही असं यूपीएतील घटक पक्ष म्हणत आहेत.

तामिळनाडूच्या जनतेनं पुन्हा एकदा जयललिता यांच्याकडे सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत. पण आगामी पाच वर्षात मात्र द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन पक्षातील राजकीय युद्ध चांगलंच रंगणार यात अजिबात शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 13, 2011 06:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close