S M L

युवराज दिसणार निओच्या वेशात

15 मेयुवराज सिंग भारतीय टीमचा सुपरहिरो आहे. पण क्रिकेटमधील या सुपरहिरोला प्रेरणा मिळते मॅट्रिक्स या कार्टून मॅगझिनमधल्या निओ या कॅरेक्टरमधून आणि खरी गंमत तर पुढेच आहे. कारण येत्या काही दिवसात युवराज आपल्याला निओच्याच वेशात दिसणार आहे. मॅगझिनच्या पहिल्या पानावर तो निओ म्हणून झळकणार आहे. मॅट्रिक्स मासिकाचा पाचवा वर्धापन दिन साजरा झाला तेव्हा सगळ्यात जास्त भाव खाल्ला तो क्रिकेटर युवराज सिंगने. विशेषांकाचे प्रकाशन त्याच्याच हस्ते झालं. जमलेली बच्चे कंपनीही युवराजवर बेहद खुश होती. तर मीडियाचे कॅमेरेही युवराजवरुन हटत नव्हते. या विशेषांकातही युवराज एक सुपरहिरो म्हणून दाखवला आहे. आणि द निओ ऑफ क्रिकेट असं नवं बिरुद त्याला त्याला देण्यात आलंय. तसंही भारतीय क्रिकेटमध्ये त्याची प्रतिमा क्रिकेटमधला कॅसानोव्हा अशीच आहे. पण गेल्या काही दिवसात मीडिया आणि प्रसिद्धीपासून तो दूर आहे. वर्ल्ड कप त्याने खुपच मनावर घेतला होता. आणि पाठोपाठ आयपीएल सुरु झालीय. त्यामुळे इतर गोष्टींसाठी त्याला वेळ मिळाला नसावा. युवराज सिंग म्हणतात, माझं लग्न ठरलेलं नाही. किंवा माझी कोणी मैत्रीणही नाही. माझं सगळे लक्ष इतके दिवस वर्ल्ड कपवरच होतं. पण मला चांगली मुलगी भेटली की मी अवश्य लग्न करेन. युवराजला पाहून एक नक्की जाणवतं, सध्या त्याचं लक्ष फक्त क्रिकेट आणि क्रिकेटवरच आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2011 01:13 PM IST

युवराज दिसणार निओच्या वेशात

15 मे

युवराज सिंग भारतीय टीमचा सुपरहिरो आहे. पण क्रिकेटमधील या सुपरहिरोला प्रेरणा मिळते मॅट्रिक्स या कार्टून मॅगझिनमधल्या निओ या कॅरेक्टरमधून आणि खरी गंमत तर पुढेच आहे. कारण येत्या काही दिवसात युवराज आपल्याला निओच्याच वेशात दिसणार आहे. मॅगझिनच्या पहिल्या पानावर तो निओ म्हणून झळकणार आहे.

मॅट्रिक्स मासिकाचा पाचवा वर्धापन दिन साजरा झाला तेव्हा सगळ्यात जास्त भाव खाल्ला तो क्रिकेटर युवराज सिंगने. विशेषांकाचे प्रकाशन त्याच्याच हस्ते झालं. जमलेली बच्चे कंपनीही युवराजवर बेहद खुश होती.

तर मीडियाचे कॅमेरेही युवराजवरुन हटत नव्हते. या विशेषांकातही युवराज एक सुपरहिरो म्हणून दाखवला आहे. आणि द निओ ऑफ क्रिकेट असं नवं बिरुद त्याला त्याला देण्यात आलंय.

तसंही भारतीय क्रिकेटमध्ये त्याची प्रतिमा क्रिकेटमधला कॅसानोव्हा अशीच आहे. पण गेल्या काही दिवसात मीडिया आणि प्रसिद्धीपासून तो दूर आहे. वर्ल्ड कप त्याने खुपच मनावर घेतला होता. आणि पाठोपाठ आयपीएल सुरु झालीय. त्यामुळे इतर गोष्टींसाठी त्याला वेळ मिळाला नसावा.

युवराज सिंग म्हणतात, माझं लग्न ठरलेलं नाही. किंवा माझी कोणी मैत्रीणही नाही. माझं सगळे लक्ष इतके दिवस वर्ल्ड कपवरच होतं. पण मला चांगली मुलगी भेटली की मी अवश्य लग्न करेन.

युवराजला पाहून एक नक्की जाणवतं, सध्या त्याचं लक्ष फक्त क्रिकेट आणि क्रिकेटवरच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2011 01:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close