S M L

दिल्लीचा पराभव करून पंजाबचे आव्हान कायम

15 मेपंजाब किंग इलेव्हनने आयपीएलमधील आपले आव्हान कायम राखले आहे. त्यांनी दिल्लीचा 29 रन्सने पराभव केला आहे. दिल्ली टीमचा हा नववा पराभव आहे. पहिली बॅटिंग करत पंजाबने दिल्लीसमोर 171 रन्सचं आव्हान ठेवलं. पण हे आव्हान दिल्लीला अजिबात पेलवलं नाही. नमन ओझा आणि डेव्हिड वॉर्नर यांनी नाही म्हणायला 51 रनची ओपनिंग टीमला करुन दिली. पण ही जोडी फुटल्यावर भरवशाचा बॅट्समन मिडल ऑर्डरमध्ये नव्हता. त्यातच वेणूगोपाळ रावही सोळा रन करुन आऊट झाला. त्यामुळे टीमच्या उरल्या सुरल्या आशाही संपल्या. पंजाबतर्फे पियुष चावलाने तीन विकेट घेतल्या. त्यापूर्वी पंजाबने 170 रनचा टप्पा गाठला तो पॉल वल्थाटीच्या बॅटिंगच्या जोरावर. पन्नास बॉलमध्ये त्याने 62 रन केले. शॉन मार्शनेही 28 बॉलमध्ये 46 रन केले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2011 04:23 PM IST

दिल्लीचा पराभव करून पंजाबचे आव्हान कायम

15 मे

पंजाब किंग इलेव्हनने आयपीएलमधील आपले आव्हान कायम राखले आहे. त्यांनी दिल्लीचा 29 रन्सने पराभव केला आहे. दिल्ली टीमचा हा नववा पराभव आहे.

पहिली बॅटिंग करत पंजाबने दिल्लीसमोर 171 रन्सचं आव्हान ठेवलं. पण हे आव्हान दिल्लीला अजिबात पेलवलं नाही. नमन ओझा आणि डेव्हिड वॉर्नर यांनी नाही म्हणायला 51 रनची ओपनिंग टीमला करुन दिली.

पण ही जोडी फुटल्यावर भरवशाचा बॅट्समन मिडल ऑर्डरमध्ये नव्हता. त्यातच वेणूगोपाळ रावही सोळा रन करुन आऊट झाला. त्यामुळे टीमच्या उरल्या सुरल्या आशाही संपल्या.

पंजाबतर्फे पियुष चावलाने तीन विकेट घेतल्या. त्यापूर्वी पंजाबने 170 रनचा टप्पा गाठला तो पॉल वल्थाटीच्या बॅटिंगच्या जोरावर. पन्नास बॉलमध्ये त्याने 62 रन केले. शॉन मार्शनेही 28 बॉलमध्ये 46 रन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2011 04:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close