S M L

मुंबईत होत आहे झाडांवर विषप्रयोग !

विनोद तळेकर , मुंबई16 मेमुंबईच्या पश्चिम उपनगरात पर्यावरणाच्या दृष्टीने आता एक नवीनच धोका निर्माण झाला आहे. सांताक्रूझ आणि आसपासच्या परिसरात बांधकाम प्रकल्पाच्या आड येणार्‍या मोठ्या वृक्षांवर विषप्रयोग करून त्यांना सुकवलं जातंय. आणि मग त्यांची कत्तल करून विकास प्रकल्पाचे इमले उभे केले जाताहेत. सांताक्रूझ आणि परिसरातील लिंक रोड भागात रस्ते हिरवीगार झाडांनी नटले आहे. पण या हिरव्यागार झाडांच्या गर्दीत दोन झाडं गेल्या चार महिन्यापासून सुकूली आहे. राज पिपला या बिल्डरच्या एका मॉलचे बांधकाम सुरू आहे. आणि हे काम सुरू झाल्यानंतरच चार महिन्यांपूर्वी ही झाडं अचानक एके दिवशी सुकून गेली. त्यामुळे ही झाडं सुकण्यामागे बिल्डर लॉबीचा हात आहे का ? असा संशय येथील एक जागरूक नागरिक आनाजी गुरव यांना आला.गेल्यावर्षी देखील याच रस्त्यावरच्या मंगलमूर्ती इमारती समोरची चार झाडं अशीच सुकून गेली होती. ती तोडल्यानंतर आता तिथं एक प्रशस्त मॉल सुरू झाला आहे. याबाबतही गुरव यांनी महापालिकेच्या एच पश्चिम वॉर्डात तक्रार दाखल केली होती. पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. याबाबत आता आयबीएन लोकमतने जेव्हा या वॉर्डचे अतिरिक्त आयुक्त क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी याबाबत कॅमेर्‍यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. गुरव यांनी 15 फेब्रुवारीला महापालिकेकडे तक्रार दिल्यानंतर तब्बल तीन महिन्यानंतर आता महापालिकेने याबाबतची तक्रार सांताक्रूझ पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.गुरव यांच्या आधीच्या तक्रारीवर जर महापालिका आणि पोलिसांनी कडक कारवाई केली असती तर झाडे मारण्याचा हा प्रकार पुन्हा झाला नसता. त्यामुळे हे लोण मुंबईत पसरण्यापूर्वी महापालिका आणि पोलसांनी यावर त्वरीत कारवाई करणे गरजेचं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 16, 2011 04:46 PM IST

मुंबईत होत आहे झाडांवर विषप्रयोग !

विनोद तळेकर , मुंबई

16 मे

मुंबईच्या पश्चिम उपनगरात पर्यावरणाच्या दृष्टीने आता एक नवीनच धोका निर्माण झाला आहे. सांताक्रूझ आणि आसपासच्या परिसरात बांधकाम प्रकल्पाच्या आड येणार्‍या मोठ्या वृक्षांवर विषप्रयोग करून त्यांना सुकवलं जातंय. आणि मग त्यांची कत्तल करून विकास प्रकल्पाचे इमले उभे केले जाताहेत.

सांताक्रूझ आणि परिसरातील लिंक रोड भागात रस्ते हिरवीगार झाडांनी नटले आहे. पण या हिरव्यागार झाडांच्या गर्दीत दोन झाडं गेल्या चार महिन्यापासून सुकूली आहे. राज पिपला या बिल्डरच्या एका मॉलचे बांधकाम सुरू आहे.

आणि हे काम सुरू झाल्यानंतरच चार महिन्यांपूर्वी ही झाडं अचानक एके दिवशी सुकून गेली. त्यामुळे ही झाडं सुकण्यामागे बिल्डर लॉबीचा हात आहे का ? असा संशय येथील एक जागरूक नागरिक आनाजी गुरव यांना आला.

गेल्यावर्षी देखील याच रस्त्यावरच्या मंगलमूर्ती इमारती समोरची चार झाडं अशीच सुकून गेली होती. ती तोडल्यानंतर आता तिथं एक प्रशस्त मॉल सुरू झाला आहे.

याबाबतही गुरव यांनी महापालिकेच्या एच पश्चिम वॉर्डात तक्रार दाखल केली होती. पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. याबाबत आता आयबीएन लोकमतने जेव्हा या वॉर्डचे अतिरिक्त आयुक्त क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी याबाबत कॅमेर्‍यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

गुरव यांनी 15 फेब्रुवारीला महापालिकेकडे तक्रार दिल्यानंतर तब्बल तीन महिन्यानंतर आता महापालिकेने याबाबतची तक्रार सांताक्रूझ पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.

गुरव यांच्या आधीच्या तक्रारीवर जर महापालिका आणि पोलिसांनी कडक कारवाई केली असती तर झाडे मारण्याचा हा प्रकार पुन्हा झाला नसता. त्यामुळे हे लोण मुंबईत पसरण्यापूर्वी महापालिका आणि पोलसांनी यावर त्वरीत कारवाई करणे गरजेचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2011 04:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close