S M L

डेक्कनने संपवले पुण्याचे आव्हान

16 मेआयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्सच्या टीमने पुणे वॉरिअर्सवर दिमाखदार विजय मिळवला आहे. डेक्कनसाठी या मॅचमध्ये टॉस जिंकण्यापासून सगळ्या गोष्टी जुळून आल्या. पुण्याला पहिली बॅटिंग दिल्यावर जेसी रायडर आणि मनिष पांडे यांनी पुण्यासाठी आक्रमक सुरुवात केली. पण रायडर चौथ्या ओव्हरमध्ये आऊट झाला. आणि त्यानंतर पुण्याची मिडल ऑर्डर कोसळली. मिशेल मार्श आणि युवराजने केलेल्या छोटेखानी इनिंगमुळे अखेर पुण्याने 136 रन केले. हा छोटा स्कोअर डेक्कनने सहज ओलांडला. शिखर धवन, सोहल, संगकारा आणि ड्युमिनी या पहिल्या चारही बॅट्समननी रन केले. आणि टीमने आरामात विजय मिळवला. पुण्याचा 12 मॅचमध्ये हा आठवा पराभव ठरला. पुणे टीमची टॉप ऑर्डर आज कोसळली. जेसी रायडर, सौरव गांगुली, रॉबिन उत्थप्पा हे प्रमुख बॅट्समन झटपट आऊट झाले. गांगुलीला तर भोपळाही फोडता आला नाही. मनिष पांडेनं 20 बॉलमध्ये 23 रन्स करत इनिंग सावरली. तर कॅप्टन युवराज सिंगने 17 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 3 फोर मारत स्कोर वाढवण्याचा प्रयत्न केला. आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या मिचेल मार्शने फटकेबाजी करत पुणे टीमला समाधानकारक स्कोर उभा करुन दिला. मिचेल मार्शने 3 सिक्स मारत 37 रन्स केले. डेक्कन चार्जर्सच्या सगळ्याच बॉलर्सनी आज टिच्चून बॉलिंग केली. आणि सुरुवातीलाच विकेट मिळाल्यामुळे त्यांचा उत्साह वाढला. डॅमियन ख्रिस्टियन, ओझा आणि अमित मिश्रा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर डेल स्टेनने एक विकेट घेतली. त्यानंतर डेक्कन टीमची सुरुवातच दणदणीत झाली. शिखर धवन आणि सनी सोहल यांनी 67 रनची ओपनिंग टीमला करुन दिली. यात शिखरने 25 बॉलमध्ये 28 रन केले. तर सनी सोहलने 34 रन केले ते 28 बॉलमध्ये. यात त्याने 2 सिक्स आणि 2 फोर मारले. त्यानंतर कुमार संगकाराने 25 तर ड्युमिनीने 23 रन केले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 16, 2011 06:21 PM IST

डेक्कनने संपवले पुण्याचे आव्हान

16 मे

आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्सच्या टीमने पुणे वॉरिअर्सवर दिमाखदार विजय मिळवला आहे. डेक्कनसाठी या मॅचमध्ये टॉस जिंकण्यापासून सगळ्या गोष्टी जुळून आल्या. पुण्याला पहिली बॅटिंग दिल्यावर जेसी रायडर आणि मनिष पांडे यांनी पुण्यासाठी आक्रमक सुरुवात केली.

पण रायडर चौथ्या ओव्हरमध्ये आऊट झाला. आणि त्यानंतर पुण्याची मिडल ऑर्डर कोसळली. मिशेल मार्श आणि युवराजने केलेल्या छोटेखानी इनिंगमुळे अखेर पुण्याने 136 रन केले.

हा छोटा स्कोअर डेक्कनने सहज ओलांडला. शिखर धवन, सोहल, संगकारा आणि ड्युमिनी या पहिल्या चारही बॅट्समननी रन केले. आणि टीमने आरामात विजय मिळवला. पुण्याचा 12 मॅचमध्ये हा आठवा पराभव ठरला. पुणे टीमची टॉप ऑर्डर आज कोसळली. जेसी रायडर, सौरव गांगुली, रॉबिन उत्थप्पा हे प्रमुख बॅट्समन झटपट आऊट झाले. गांगुलीला तर भोपळाही फोडता आला नाही.

मनिष पांडेनं 20 बॉलमध्ये 23 रन्स करत इनिंग सावरली. तर कॅप्टन युवराज सिंगने 17 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 3 फोर मारत स्कोर वाढवण्याचा प्रयत्न केला.

आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या मिचेल मार्शने फटकेबाजी करत पुणे टीमला समाधानकारक स्कोर उभा करुन दिला. मिचेल मार्शने 3 सिक्स मारत 37 रन्स केले.

डेक्कन चार्जर्सच्या सगळ्याच बॉलर्सनी आज टिच्चून बॉलिंग केली. आणि सुरुवातीलाच विकेट मिळाल्यामुळे त्यांचा उत्साह वाढला. डॅमियन ख्रिस्टियन, ओझा आणि अमित मिश्रा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर डेल स्टेनने एक विकेट घेतली.

त्यानंतर डेक्कन टीमची सुरुवातच दणदणीत झाली. शिखर धवन आणि सनी सोहल यांनी 67 रनची ओपनिंग टीमला करुन दिली. यात शिखरने 25 बॉलमध्ये 28 रन केले. तर सनी सोहलने 34 रन केले ते 28 बॉलमध्ये. यात त्याने 2 सिक्स आणि 2 फोर मारले. त्यानंतर कुमार संगकाराने 25 तर ड्युमिनीने 23 रन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2011 06:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close