S M L

'आदर्श'च्या गायब हार्ड डिस्कमुळे माहिती दडपवण्याचा प्रयत्न

अजित मांढरे, मंुबई 17 मेआदर्श घोटाळ्याप्रकरणी काल आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली. नगरविकास खात्याच्या 10 पैकी एका कॉम्प्यूटरची हार्ड डिस्क गायब झाल्याची माहिती सीबीआयने काल सुनावणीदरम्यान कोर्टात दिली. नगरविकास खात्यातून गहाळ झालेल्या फाईलमधल्या पानात आणि गहाळ झालेल्या हार्ड डिस्कमध्ये कॅप्टन प्रकाश पेठे मार्गाला कोणी कोणी एनओसी दिली त्याचबरोबर आदर्शला सीआरझेड क्लिअरन्स कोणी दिला. या संबंधीत महत्त्वाची कागदपत्र आणि नोटींग्ज असल्याची माहिती उघड झाली आहे.सुरुवातीला आदर्श सोसायटीच्या फाईलमधील गायब पानं गहाळ झाल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर केंद्रीय पर्यावरण खात्यातून आदर्शची संपूर्ण फाईलच गहाळ झाल्याचा प्रकार घडला. आणि आता आदर्श सोसायटी संदर्भातील महत्त्वाची कागदपत्र असलेली हार्ड डिस्क गहाळ झाल्याचा प्रकार घडला. त्यामुळे नगरविकास खात्यात नेमकं घडतंय तरी काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे. गहाळ झालेल्या हार्ड डिस्कचा शोध घेण्याकरता कोर्टाने नगर विकासखात्याच्या तीन कर्मचार्‍यांना 2 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावलीय. नगरविकास खात्यातून गहाळ झालेल्या फाईलमधील पानात आणि गहाळ झालेल्या हार्ड डिस्कमध्ये कॅप्टन प्रकाश पेठे मार्गाला कोणी कोणी एनओसी दिलीय त्याचबरोबर आदर्शला सीआरझेड क्लिअरन्स कोणी दिला. या संबंधीचे महत्त्वाचे कागदपत्रं आणि नोटींग्ज आहेत. आणि याच दोन विषयावरुन आदर्श सोसायटीचा घोटाळा उघडकीस आला होता. नगर विकास खात्यातून आदर्श सोसायटीच्या फाईल मधील चार पानं गायब करण्यात आली आणि आता एका कॉम्प्यूटरची हार्ड डिस्क गायब करण्यात आली. ही सर्व प्रकार कोणाला वाचवण्यासाठी केला जातोय याचा तपास आता सीबीआय घेणार आहे. आदर्श सोसायटीचा घोटाळा उघडकीस आल्यापासून आदर्श सोसायटी संबंधीच्या फायली आणि इतर गोष्टी गहाळ होण्याचे प्रकार सुरु झालेत. या फाईल आणि हार्ड डिस्क चोरीला जाण्याच्या प्रकारामुळे आदर्श घोटाळ्याच्या तपासाला खीळ बसतेय असं एका सीबीआयच्या अधिकार्‍यांचे म्हणणं आहे. त्यामुळे सीबीआय आता कोणत्या दिशेनं तपास करतेय हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2011 09:46 AM IST

'आदर्श'च्या गायब हार्ड डिस्कमुळे माहिती दडपवण्याचा प्रयत्न

अजित मांढरे, मंुबई

17 मे

आदर्श घोटाळ्याप्रकरणी काल आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली. नगरविकास खात्याच्या 10 पैकी एका कॉम्प्यूटरची हार्ड डिस्क गायब झाल्याची माहिती सीबीआयने काल सुनावणीदरम्यान कोर्टात दिली.

नगरविकास खात्यातून गहाळ झालेल्या फाईलमधल्या पानात आणि गहाळ झालेल्या हार्ड डिस्कमध्ये कॅप्टन प्रकाश पेठे मार्गाला कोणी कोणी एनओसी दिली त्याचबरोबर आदर्शला सीआरझेड क्लिअरन्स कोणी दिला. या संबंधीत महत्त्वाची कागदपत्र आणि नोटींग्ज असल्याची माहिती उघड झाली आहे.

सुरुवातीला आदर्श सोसायटीच्या फाईलमधील गायब पानं गहाळ झाल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर केंद्रीय पर्यावरण खात्यातून आदर्शची संपूर्ण फाईलच गहाळ झाल्याचा प्रकार घडला.

आणि आता आदर्श सोसायटी संदर्भातील महत्त्वाची कागदपत्र असलेली हार्ड डिस्क गहाळ झाल्याचा प्रकार घडला. त्यामुळे नगरविकास खात्यात नेमकं घडतंय तरी काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

गहाळ झालेल्या हार्ड डिस्कचा शोध घेण्याकरता कोर्टाने नगर विकासखात्याच्या तीन कर्मचार्‍यांना 2 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावलीय.

नगरविकास खात्यातून गहाळ झालेल्या फाईलमधील पानात आणि गहाळ झालेल्या हार्ड डिस्कमध्ये कॅप्टन प्रकाश पेठे मार्गाला कोणी कोणी एनओसी दिलीय त्याचबरोबर आदर्शला सीआरझेड क्लिअरन्स कोणी दिला.

या संबंधीचे महत्त्वाचे कागदपत्रं आणि नोटींग्ज आहेत. आणि याच दोन विषयावरुन आदर्श सोसायटीचा घोटाळा उघडकीस आला होता. नगर विकास खात्यातून आदर्श सोसायटीच्या फाईल मधील चार पानं गायब करण्यात आली आणि आता एका कॉम्प्यूटरची हार्ड डिस्क गायब करण्यात आली. ही सर्व प्रकार कोणाला वाचवण्यासाठी केला जातोय याचा तपास आता सीबीआय घेणार आहे.

आदर्श सोसायटीचा घोटाळा उघडकीस आल्यापासून आदर्श सोसायटी संबंधीच्या फायली आणि इतर गोष्टी गहाळ होण्याचे प्रकार सुरु झालेत. या फाईल आणि हार्ड डिस्क चोरीला जाण्याच्या प्रकारामुळे आदर्श घोटाळ्याच्या तपासाला खीळ बसतेय असं एका सीबीआयच्या अधिकार्‍यांचे म्हणणं आहे. त्यामुळे सीबीआय आता कोणत्या दिशेनं तपास करतेय हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2011 09:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close