S M L

चालत्या रेल्वेतून विद्यार्थ्याला टिसीने फेकले

17 मेरेल्वे टिसीने एका विद्यार्थ्याला रेल्वेमधून फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये घडला आहे. स्वप्नील बोरसे हा विद्यार्थी मुंबईहून नागपूरकडे जाणार्‍या सेवाग्राम एक्सप्रेसमधून प्रवास करत होता. तिकिटाच्या मुद्द्यावरून पी. पी. घोडके या टिसीबरोबर त्याचा नांदगाव आणि चाळीसगावच्या दरम्यान वाद झाला. त्यातूनच या टिसीने त्याला नांदगाव रेल्वे स्टेशनवर ढकलून दिल्याचे या विद्यार्थ्याचे म्हणणं आहे. हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. जखमी विद्यार्थ्याने टिसीचं नाव रेल्वे पोलिसांना सांगूनही पोलिसांनी अज्ञात टिसीविरोधात चाळीसगाव रेल्वे पोलीस स्टेेशनमध्ये गुन्हा दाखल केला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2011 10:55 AM IST

चालत्या रेल्वेतून विद्यार्थ्याला टिसीने फेकले

17 मे

रेल्वे टिसीने एका विद्यार्थ्याला रेल्वेमधून फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये घडला आहे. स्वप्नील बोरसे हा विद्यार्थी मुंबईहून नागपूरकडे जाणार्‍या सेवाग्राम एक्सप्रेसमधून प्रवास करत होता.

तिकिटाच्या मुद्द्यावरून पी. पी. घोडके या टिसीबरोबर त्याचा नांदगाव आणि चाळीसगावच्या दरम्यान वाद झाला. त्यातूनच या टिसीने त्याला नांदगाव रेल्वे स्टेशनवर ढकलून दिल्याचे या विद्यार्थ्याचे म्हणणं आहे.

हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. जखमी विद्यार्थ्याने टिसीचं नाव रेल्वे पोलिसांना सांगूनही पोलिसांनी अज्ञात टिसीविरोधात चाळीसगाव रेल्वे पोलीस स्टेेशनमध्ये गुन्हा दाखल केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2011 10:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close