S M L

ब्रेट लीने मुलांसाठी उभारले म्युझिक सेंटर

17 मेऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर ब्रेट ली क्रिकेटबरोबरच संगीताचाही मोठा फॅन आहे. म्युझिकसाठी तो नेहमीच वेळात वेळ काढत असतो. आता नवीन गोष्ट म्हणजे ब्रेट लीनं आज मुंबईत 'म्युझिक' नावाच्या कम्युनिटी म्युझिक सेंटरची स्थापना केली. या फाऊंडेशनमध्ये 'प्रथम' ही सामाजिक संस्था सहभागी झाली असून या उपक्रमाअंतर्गत समाजातल्या गरीब मुलांना संगीत शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संगीताविषयी आवड असलेल्या गरीब मुलांना तबला, गिटार, की बोर्ड, बासरी या वाद्यांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इतकचं नाही तर संगीताबरोबरच त्यांच्या शिक्षणाच्या सोई आणि व्यक्तिमत्व विकासावर हे फाऊंडेशन काम करणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2011 11:11 AM IST

ब्रेट लीने मुलांसाठी उभारले म्युझिक सेंटर

17 मे

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर ब्रेट ली क्रिकेटबरोबरच संगीताचाही मोठा फॅन आहे. म्युझिकसाठी तो नेहमीच वेळात वेळ काढत असतो. आता नवीन गोष्ट म्हणजे ब्रेट लीनं आज मुंबईत 'म्युझिक' नावाच्या कम्युनिटी म्युझिक सेंटरची स्थापना केली.

या फाऊंडेशनमध्ये 'प्रथम' ही सामाजिक संस्था सहभागी झाली असून या उपक्रमाअंतर्गत समाजातल्या गरीब मुलांना संगीत शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

संगीताविषयी आवड असलेल्या गरीब मुलांना तबला, गिटार, की बोर्ड, बासरी या वाद्यांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इतकचं नाही तर संगीताबरोबरच त्यांच्या शिक्षणाच्या सोई आणि व्यक्तिमत्व विकासावर हे फाऊंडेशन काम करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2011 11:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close