S M L

चोपडा साखर कारखान्याने कामगारांचा पगार थकवला

17 मेजळगावच्या चोपडा सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचा 6 महिन्याचा पगार थकला आहे. हा कारखाना सुरु असून यंदाच्या हंगामात 2 लाख 65 हजार टन गाळप करुनही कामगारांचा पगार थकला आहे. पण कारखाना आर्थिक अडचणीत असला तरी कामगारांचा पगार लवकर देणार असल्याचे व्यवस्थापनाचं म्हणणं आहे. जळगांव जिल्ह्यात 5 साखर कारखाने बंद आहेत. पण चोपडा सहकारी साखर कारखाना सुरू आहे. ऑक्टोबर 2010 पासून कायमस्वरुपी 249 आणि कामगारांना कारखान्याने पगारंच दिला नाही. यंदाच्या हंगामात झालेल्या विक्रमी गाळपानंतर पगार मिळतील असं व्यवस्थापनाने आश्वासन दिल्याचे कामगारांचे म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2011 03:19 PM IST

चोपडा साखर कारखान्याने कामगारांचा पगार थकवला

17 मे

जळगावच्या चोपडा सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचा 6 महिन्याचा पगार थकला आहे. हा कारखाना सुरु असून यंदाच्या हंगामात 2 लाख 65 हजार टन गाळप करुनही कामगारांचा पगार थकला आहे.

पण कारखाना आर्थिक अडचणीत असला तरी कामगारांचा पगार लवकर देणार असल्याचे व्यवस्थापनाचं म्हणणं आहे. जळगांव जिल्ह्यात 5 साखर कारखाने बंद आहेत.

पण चोपडा सहकारी साखर कारखाना सुरू आहे. ऑक्टोबर 2010 पासून कायमस्वरुपी 249 आणि कामगारांना कारखान्याने पगारंच दिला नाही. यंदाच्या हंगामात झालेल्या विक्रमी गाळपानंतर पगार मिळतील असं व्यवस्थापनाने आश्वासन दिल्याचे कामगारांचे म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2011 03:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close