S M L

मोजक्या शाळांमुळे विद्यार्थांचा कोंडी !

गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड17 मेआठवीपर्यंतच्या मुलांना नापास न करण्याचा निर्णय सरकारने गेल्यावर्षीपासून लागू केला. पण वाढीव संख्येने येणार्‍या या मुलांसाठी शाळेत जागाच उपलब्ध नसल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात उर्दू माध्यमाच्या शेकडो विद्यार्थ्यांवर सध्या शिक्षण सोडण्याची वेळ आलीय ती यामुळेच. पिपंरी-चिंचवड महानगरपालिका उर्दू माध्यमातील केवळ एकच माध्यमिक शाळा चालवते. इंग्रजी आणि हिंदी माध्यमासाठी इथं पालिकेच्या माध्यमिक शाळाच नाही. त्यामुळे पालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या गरीब विद्यार्थ्यांनी पुढचं शिक्षण कुठे घ्यायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे.नाजीमने उर्दू माध्यमातून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. पण पालिकेच्या एकमेव उर्दू माध्यमिक शाळेत त्याला प्रवेश मिळाला नाही. शाळेची विद्यार्थी क्षमता पूर्ण झालीय आणि बरेच विद्यार्थी शाळेच्या बाहेर राहिले.गरीब विद्यार्थ्यांचे हाल- पालिकेच्या एकूण शाळा 140 - मराठी प्राथमिक, माध्यमिक माध्यमांच्या 116 शाळा- हिंदी प्राथमिक शाळा -3 - हिंदी माध्यमिक शाळा नाही- इंग्रजी प्राथमिक शाळा 2 - इंग्रजी माध्यमिक शाळा नाही- उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळा 12- उर्दू माध्यमिक शाळा फक्त 1 2005 महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नवीन उर्दू माध्यमिक शाळा सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव संमत झाला. पण त्याची अंमलबजावणी अजूनही झाली नाही. पालिकेचा मात्र दावा आहे की अंमलबजावणी सुरु आहे. एकीकडे खाजगी शाळा मनमानी फीवाढ करत आहे. त्यामुळे खाजगी शाळेत शिकणं सामान्यांच्या अवाक्याबाहेर चाललं. अशावेळी पालिकेतर्फे दिल्या जाणार्‍या अपुर्‍या शाळाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची गरज आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2011 02:20 PM IST

मोजक्या शाळांमुळे विद्यार्थांचा कोंडी !

गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड

17 मे

आठवीपर्यंतच्या मुलांना नापास न करण्याचा निर्णय सरकारने गेल्यावर्षीपासून लागू केला. पण वाढीव संख्येने येणार्‍या या मुलांसाठी शाळेत जागाच उपलब्ध नसल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात उर्दू माध्यमाच्या शेकडो विद्यार्थ्यांवर सध्या शिक्षण सोडण्याची वेळ आलीय ती यामुळेच. पिपंरी-चिंचवड महानगरपालिका उर्दू माध्यमातील केवळ एकच माध्यमिक शाळा चालवते.

इंग्रजी आणि हिंदी माध्यमासाठी इथं पालिकेच्या माध्यमिक शाळाच नाही. त्यामुळे पालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या गरीब विद्यार्थ्यांनी पुढचं शिक्षण कुठे घ्यायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाजीमने उर्दू माध्यमातून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. पण पालिकेच्या एकमेव उर्दू माध्यमिक शाळेत त्याला प्रवेश मिळाला नाही. शाळेची विद्यार्थी क्षमता पूर्ण झालीय आणि बरेच विद्यार्थी शाळेच्या बाहेर राहिले.

गरीब विद्यार्थ्यांचे हाल

- पालिकेच्या एकूण शाळा 140 - मराठी प्राथमिक, माध्यमिक माध्यमांच्या 116 शाळा- हिंदी प्राथमिक शाळा -3 - हिंदी माध्यमिक शाळा नाही- इंग्रजी प्राथमिक शाळा 2 - इंग्रजी माध्यमिक शाळा नाही- उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळा 12- उर्दू माध्यमिक शाळा फक्त 1

2005 महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नवीन उर्दू माध्यमिक शाळा सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव संमत झाला. पण त्याची अंमलबजावणी अजूनही झाली नाही. पालिकेचा मात्र दावा आहे की अंमलबजावणी सुरु आहे.

एकीकडे खाजगी शाळा मनमानी फीवाढ करत आहे. त्यामुळे खाजगी शाळेत शिकणं सामान्यांच्या अवाक्याबाहेर चाललं. अशावेळी पालिकेतर्फे दिल्या जाणार्‍या अपुर्‍या शाळाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची गरज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2011 02:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close