S M L

दाऊदच्या भावावर हल्ला ; बॉडीगार्ड ठार

17 मेअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरवर याच्यावर दक्षिण मुंबईत हल्ला करण्यात आला आहे. या हल्यात कासकर थोडक्यात बचावला आहे. मात्र यात त्याचा बॉडीगार्ड मात्र मारला गेला आहे. इक्बाल कासकर हा मुंबईतल्या सारा सहारा प्रकरणात आरोपी आहे. त्याच्यावर जमीन अतिक्रमणाचाही आरोप आहे. दुबईहून डिपोर्ट करुन त्याला मोकाखाली अटक करण्यात आली होती. कासकरवर हल्ला करण्यार्‍या दोघांना लोकांनी पकडून पायधुणी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. इक्कबाल कासकर आपल्या साथीदारांसोबत चर्चा करत होता तितक्यात तेथे दोन हल्लेखोर आले आणि त्यांच्या दिशेनं गोळ्या झाड्याला सुरूवात केली. हल्लेखोरांनी जवळपास पाच राऊंड फायर केले आहे. मात्र या फायरिंगमध्ये कासकराला एक ही गोळी लागली नाही. पण कासकरचा बॉडीगार्ड यात मारला गेला आहे. कासकरवर ज्या ठिकाणी हल्ला करण्यात आला ते ठिकाण दाऊदच्या घराजवळ आहे. हा हल्ला रात्री 10 ते 10:30 च्या दरम्यान झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा हल्ला भरत नेपाळीने केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2011 05:10 PM IST

दाऊदच्या भावावर हल्ला ; बॉडीगार्ड ठार

17 मे

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरवर याच्यावर दक्षिण मुंबईत हल्ला करण्यात आला आहे. या हल्यात कासकर थोडक्यात बचावला आहे. मात्र यात त्याचा बॉडीगार्ड मात्र मारला गेला आहे. इक्बाल कासकर हा मुंबईतल्या सारा सहारा प्रकरणात आरोपी आहे. त्याच्यावर जमीन अतिक्रमणाचाही आरोप आहे. दुबईहून डिपोर्ट करुन त्याला मोकाखाली अटक करण्यात आली होती. कासकरवर हल्ला करण्यार्‍या दोघांना लोकांनी पकडून पायधुणी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

इक्कबाल कासकर आपल्या साथीदारांसोबत चर्चा करत होता तितक्यात तेथे दोन हल्लेखोर आले आणि त्यांच्या दिशेनं गोळ्या झाड्याला सुरूवात केली. हल्लेखोरांनी जवळपास पाच राऊंड फायर केले आहे. मात्र या फायरिंगमध्ये कासकराला एक ही गोळी लागली नाही. पण कासकरचा बॉडीगार्ड यात मारला गेला आहे. कासकरवर ज्या ठिकाणी हल्ला करण्यात आला ते ठिकाण दाऊदच्या घराजवळ आहे. हा हल्ला रात्री 10 ते 10:30 च्या दरम्यान झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा हल्ला भरत नेपाळीने केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2011 05:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close