S M L

राष्ट्रपतींसमोर येडियुरप्पा सरकारच्या 121 आमदारांची परेड

17 मेसरकार वाचवण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आज राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन केलं. संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रपतींसमोर 121 आमदारांची परेड केली आणि सरकार बहुमतात असल्याचा दावा केला. भाजपचे नेते अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखाली आमदारांच्या या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सुषमा स्वराज आणि व्यंकय्या नायडू हे नेतेही उपस्थित होते. कर्नाटकचे राज्यपाल हंसराज भारद्वाज यांनी केलेली सरकार बरखास्तीची शिफारस पक्षपातीपणाची आहे. ती स्वीकारू नये अशी विनंती येडियुरप्पा यांनी राष्ट्रपतींकडे केली. तर राज्यपालांची कृती घटनाबाह्य आहे. बहुमताची परीक्षा विधानसभेत होऊ द्यावी असं भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रपतींना सांगितलं. दुसरीकडे राज्यपाल हंसराज भारद्वाज यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आजही बंगळुरूमध्ये राजभवनासमोर निदर्शनं केली. पण हंसराज भारद्वाज मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. कर्नाटक सरकारनं घटनेचं उल्लंघन केलंय. त्यामुळे राष्ट्रपती राजवटीची केलेली शिफारस योग्यच आहे, असं भारद्वाज यांनी स्पष्ट केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2011 06:00 PM IST

राष्ट्रपतींसमोर येडियुरप्पा सरकारच्या 121 आमदारांची परेड

17 मे

सरकार वाचवण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आज राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन केलं. संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रपतींसमोर 121 आमदारांची परेड केली आणि सरकार बहुमतात असल्याचा दावा केला.

भाजपचे नेते अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखाली आमदारांच्या या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सुषमा स्वराज आणि व्यंकय्या नायडू हे नेतेही उपस्थित होते.

कर्नाटकचे राज्यपाल हंसराज भारद्वाज यांनी केलेली सरकार बरखास्तीची शिफारस पक्षपातीपणाची आहे. ती स्वीकारू नये अशी विनंती येडियुरप्पा यांनी राष्ट्रपतींकडे केली. तर राज्यपालांची कृती घटनाबाह्य आहे. बहुमताची परीक्षा विधानसभेत होऊ द्यावी असं भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रपतींना सांगितलं.

दुसरीकडे राज्यपाल हंसराज भारद्वाज यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आजही बंगळुरूमध्ये राजभवनासमोर निदर्शनं केली.

पण हंसराज भारद्वाज मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. कर्नाटक सरकारनं घटनेचं उल्लंघन केलंय. त्यामुळे राष्ट्रपती राजवटीची केलेली शिफारस योग्यच आहे, असं भारद्वाज यांनी स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2011 06:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close