S M L

पंजाबचं आयपीएलमध्ये आव्हान कायम

17 मेकिंग्ज इलेव्हन पंजाबच्या टीमने आयपीएलमधील आपलं आव्हान कायम राखलं आहे. किंग्ज इलेव्हनने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 111 रन्सने धुव्वा उडवला. कॅप्टन ऍडम गिलख्रिस्ट आणि शॉन मार्शने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पहिली बॅटिंग करणार्‍या किंग्ज इलेव्हनने 232 रन्सचा डोंगर उभा केला. गिलख्रस्ट आणि मार्शने 206 रन्सची हायेस्ट पार्टनरशीप केली. गिलख्रिस्टने शानदार सेंच्युरी ठोकली. याला उत्तर देताना बंगलोर रॉयलची इनिंग अवघ्या 121 रन्सवर आटोपली. एबी डिव्हिलिअर्सनं सर्वाधिक 34 रन्स केले. पण किंग्ज इलेव्हनच्या बॉलर्ससमोर बंगलोरचे इतर बॅट्समन सपशेल फ्लॉप ठरले. या विजयाबरोबरच किंग्जच्या प्ले ऑफमध्ये खेळण्याच्या आशा जिंवत राहिल्या आहेत. 13 मॅचमध्ये किंग्जच्या खात्यात 14 पॉईंट जमा झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2011 06:27 PM IST

पंजाबचं आयपीएलमध्ये आव्हान कायम

17 मे

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या टीमने आयपीएलमधील आपलं आव्हान कायम राखलं आहे. किंग्ज इलेव्हनने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 111 रन्सने धुव्वा उडवला.

कॅप्टन ऍडम गिलख्रिस्ट आणि शॉन मार्शने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पहिली बॅटिंग करणार्‍या किंग्ज इलेव्हनने 232 रन्सचा डोंगर उभा केला. गिलख्रस्ट आणि मार्शने 206 रन्सची हायेस्ट पार्टनरशीप केली. गिलख्रिस्टने शानदार सेंच्युरी ठोकली.

याला उत्तर देताना बंगलोर रॉयलची इनिंग अवघ्या 121 रन्सवर आटोपली. एबी डिव्हिलिअर्सनं सर्वाधिक 34 रन्स केले. पण किंग्ज इलेव्हनच्या बॉलर्ससमोर बंगलोरचे इतर बॅट्समन सपशेल फ्लॉप ठरले.

या विजयाबरोबरच किंग्जच्या प्ले ऑफमध्ये खेळण्याच्या आशा जिंवत राहिल्या आहेत. 13 मॅचमध्ये किंग्जच्या खात्यात 14 पॉईंट जमा झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2011 06:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close