S M L

कलमाडींवर होणार आरोप निश्चित !

18 मेकॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी आयोजन समितीचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडींवर लवकरच आरोप निश्चित होणार आहेत. सीबीआयच्या चार्जशीटची एक प्रत आयबीएन नेटवर्कच्या हाती लागली आहे. येत्या 23 मे पर्यंत सीबीआय ही चार्जशीट दाखल करेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. स्वीस कंपनीला दिलेल्या टाईम स्कोअरिंग मशीन्सच्या कॉन्ट्रक्टमध्ये घोटाळा झाल्याचा कलमाडींवर आरोप आहे. दरम्यान, सुरेश कलमाडी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. जामीन अर्जावर सुनावणीसाठी कलमाडी यांना आज दिल्लीतल्या पतियाळा हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी कोर्टाने त्यांच्या कोठडीत 1 जूनपर्यंत वाढ केली आहे. कलमाडींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर राहण्याची परवानगी द्यावी अशी विनंती त्यांच्या वकिलांनी केली. या प्रकरणावर 21 मे रोजी सुनावणी होणार आहे.कलमाडींवर आरोप - टाईम स्कोअर मशीन्सचं कॉन्ट्रॅक्ट देण्याची निवड प्रक्रिया तीन वर्षं चालली- स्वीस घड्याळं घेण्याचा इरादा व्यक्त केल्यानंतर स्वीस कंपनीनं एक वर्ष उलटून गेल्यावर त्यांच्या निविदेचं सादरीकरण केलं- ऑलिपिंक वित्त समितीच्या सहमतीशिवायच ललित भानोत यांनी हे इरादा करार प्रकाशित केला होता- करारासाठी उशीर झाल्याने स्वीस टाईमिंगनं त्यात 18 कोटींची वाढ केली- टीएसआर मशीन्स घेण्यासाठी व्ही.के.वर्मांनी पात्रता निकषांमध्ये बदल केले, एक्झिक्युटिव्ह बोर्डाला कल्पना नव्हती- करार मंजूर करून घेण्यासाठी कलमाडींनी एक समिती स्थापन केली- या समितीत स्वीस टाईमिंगच्या मर्जीतल्या लोकांचा समावेश केला- कराराला विरोध करणार्‍या व्ही.के.गौतम, सुजित पानीग्रहींचा राजीनामा- या कॉन्ट्रॅक्टमुळे आयोजन समितीला तब्बल 90 कोटींचं नुकसान - सुरेश कलमाडी, ललित भानोत, व्ही.के. वर्मा, ए. एस. व्ही प्रसाद आरोप निश्चित- कलम 467 आणि 420 अंतर्गत आरोप दाखल होणारकाही अनुत्तरित प्रश्न- जर या कॉन्ट्रक्टमध्येच तोटा झाला असेल तर मग कलमाडी, भानोत, वर्मा यांचा फायदा कसा झाला ?- एमएसएल स्पेन या कंपनीच्या कर्मचार्‍यांची अजून चौकशी का झाली नाही ? - टाईम मशीन्स कॉन्ट्रॅक्टसाठी एमएसएल स्पेन ही कंपनी खरोखरच पात्र होती का ?

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2011 02:41 PM IST

कलमाडींवर होणार आरोप निश्चित !

18 मे

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी आयोजन समितीचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडींवर लवकरच आरोप निश्चित होणार आहेत. सीबीआयच्या चार्जशीटची एक प्रत आयबीएन नेटवर्कच्या हाती लागली आहे. येत्या 23 मे पर्यंत सीबीआय ही चार्जशीट दाखल करेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

स्वीस कंपनीला दिलेल्या टाईम स्कोअरिंग मशीन्सच्या कॉन्ट्रक्टमध्ये घोटाळा झाल्याचा कलमाडींवर आरोप आहे. दरम्यान, सुरेश कलमाडी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

जामीन अर्जावर सुनावणीसाठी कलमाडी यांना आज दिल्लीतल्या पतियाळा हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी कोर्टाने त्यांच्या कोठडीत 1 जूनपर्यंत वाढ केली आहे.

कलमाडींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर राहण्याची परवानगी द्यावी अशी विनंती त्यांच्या वकिलांनी केली. या प्रकरणावर 21 मे रोजी सुनावणी होणार आहे.

कलमाडींवर आरोप

- टाईम स्कोअर मशीन्सचं कॉन्ट्रॅक्ट देण्याची निवड प्रक्रिया तीन वर्षं चालली- स्वीस घड्याळं घेण्याचा इरादा व्यक्त केल्यानंतर स्वीस कंपनीनं एक वर्ष उलटून गेल्यावर त्यांच्या निविदेचं सादरीकरण केलं- ऑलिपिंक वित्त समितीच्या सहमतीशिवायच ललित भानोत यांनी हे इरादा करार प्रकाशित केला होता- करारासाठी उशीर झाल्याने स्वीस टाईमिंगनं त्यात 18 कोटींची वाढ केली- टीएसआर मशीन्स घेण्यासाठी व्ही.के.वर्मांनी पात्रता निकषांमध्ये बदल केले, एक्झिक्युटिव्ह बोर्डाला कल्पना नव्हती- करार मंजूर करून घेण्यासाठी कलमाडींनी एक समिती स्थापन केली- या समितीत स्वीस टाईमिंगच्या मर्जीतल्या लोकांचा समावेश केला- कराराला विरोध करणार्‍या व्ही.के.गौतम, सुजित पानीग्रहींचा राजीनामा- या कॉन्ट्रॅक्टमुळे आयोजन समितीला तब्बल 90 कोटींचं नुकसान - सुरेश कलमाडी, ललित भानोत, व्ही.के. वर्मा, ए. एस. व्ही प्रसाद आरोप निश्चित- कलम 467 आणि 420 अंतर्गत आरोप दाखल होणार

काही अनुत्तरित प्रश्न

- जर या कॉन्ट्रक्टमध्येच तोटा झाला असेल तर मग कलमाडी, भानोत, वर्मा यांचा फायदा कसा झाला ?- एमएसएल स्पेन या कंपनीच्या कर्मचार्‍यांची अजून चौकशी का झाली नाही ? - टाईम मशीन्स कॉन्ट्रॅक्टसाठी एमएसएल स्पेन ही कंपनी खरोखरच पात्र होती का ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2011 02:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close