S M L

लोकांची फसवणूक करणार्‍या भागवतकडे 66 अलिशान गाड्या

18 मेनवजीवन इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून हजारो लोकांची फसवणूक करणार्‍या विष्णू भागवतने गैरमार्गाने कोट्यवधी रूपयांची संपत्ती जमा केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. विष्णू भागवतच्या नावावर तब्बल 66 आलिशान गाड्या आहेत. त्यापैकी अनेक गाड्या त्याचे एजंट वापरत होते. एजंटांना बक्षिस म्हणून वाटलेल्या आलिशान गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. दरम्यान याप्रकरणात ओरिएंटल इन्शुरन्स कंपनाचे श्रीरामपूर शाखेचे शाखा व्यवस्थापक दिलीप पाटील यालाही अटक केली आहे. एकाच व्यक्तिच्या नावाने 66 वाहनांची नोंदणी होऊनही आरटीओ कार्यालयातील अधिकार्‍यांना भागवतचा संशय आला नाही. याबद्दल आश्यर्य व्यक्त करण्याचे कारण नाही. कारण भागवतने आरटीओ कार्यालयातील अधिकार्‍यांनाही आपलेसं केलं होतं. 5, 55, 555, 5555 हे नंबर भागवतच्या गाड्यांसाठी राखूनच ठेवलेले असायचे भागवतने वाहन खरेदी करताच जी सिरीज सुरू असेल त्यातील पाच हा क्रमांक असलेला क्रमांक त्याला दिला जायचा. भागवतच्या अजूनही भानगडी उजेडात येण्याची शक्यता आहे. विष्णू भागवतच्या नावावर ऑडी, इंडिगो, इंडिका या वाहनांचा समावेश आहे. एजंट नेमताना विष्णू भागवत दहा लाख रूपये ऍडव्हान्स घ्यायचा. आणि जो एजट दहा लाख फेडून पुन्हा दहा लाखांचा बिझनेस करेल त्याला कार भेट म्हणून द्यायचा. पण त्यानंतरही हे वाहन विष्णू भागवतच्याच नावाने असतं. एजंटाने नंतर वसुली थांबवली तर दुरूस्तीच्या नावाखाली भागवत पुन्हा ते वाहन जप्त करीत असे पोलिसांनी आता ही वाहनेच जप्त केली आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2011 12:05 PM IST

लोकांची फसवणूक करणार्‍या भागवतकडे 66 अलिशान गाड्या

18 मे

नवजीवन इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून हजारो लोकांची फसवणूक करणार्‍या विष्णू भागवतने गैरमार्गाने कोट्यवधी रूपयांची संपत्ती जमा केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे.

विष्णू भागवतच्या नावावर तब्बल 66 आलिशान गाड्या आहेत. त्यापैकी अनेक गाड्या त्याचे एजंट वापरत होते. एजंटांना बक्षिस म्हणून वाटलेल्या आलिशान गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. दरम्यान याप्रकरणात ओरिएंटल इन्शुरन्स कंपनाचे श्रीरामपूर शाखेचे शाखा व्यवस्थापक दिलीप पाटील यालाही अटक केली आहे.

एकाच व्यक्तिच्या नावाने 66 वाहनांची नोंदणी होऊनही आरटीओ कार्यालयातील अधिकार्‍यांना भागवतचा संशय आला नाही. याबद्दल आश्यर्य व्यक्त करण्याचे कारण नाही.

कारण भागवतने आरटीओ कार्यालयातील अधिकार्‍यांनाही आपलेसं केलं होतं. 5, 55, 555, 5555 हे नंबर भागवतच्या गाड्यांसाठी राखूनच ठेवलेले असायचे भागवतने वाहन खरेदी करताच जी सिरीज सुरू असेल त्यातील पाच हा क्रमांक असलेला क्रमांक त्याला दिला जायचा. भागवतच्या अजूनही भानगडी उजेडात येण्याची शक्यता आहे.

विष्णू भागवतच्या नावावर ऑडी, इंडिगो, इंडिका या वाहनांचा समावेश आहे. एजंट नेमताना विष्णू भागवत दहा लाख रूपये ऍडव्हान्स घ्यायचा. आणि जो एजट दहा लाख फेडून पुन्हा दहा लाखांचा बिझनेस करेल त्याला कार भेट म्हणून द्यायचा.

पण त्यानंतरही हे वाहन विष्णू भागवतच्याच नावाने असतं. एजंटाने नंतर वसुली थांबवली तर दुरूस्तीच्या नावाखाली भागवत पुन्हा ते वाहन जप्त करीत असे पोलिसांनी आता ही वाहनेच जप्त केली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2011 12:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close