S M L

सिंहगड इन्स्टिट्यूटने हडप केली 13 एकर जागा

अद्वैत मेहता पुणे 18 मेसिंहगड इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा मारुती नवले यांनी 13 एकर जागा हडप केल्याचा आरोप पवन गांधी चॅरिटेबल ट्रस्टने केला आहे. खोटी कागपत्र सादर करून ही जागा हडप करण्यात आलीय. या प्रकरणी गुंडांकडून धमक्या येत असल्याची तक्रार ट्रस्टने पोलिसात केली आहे. जून महिन्यात धर्मदाय आयुक्तांकडे या प्रकरणीची सुनावणी होणार आहे.1987 ला पुण्यातला बी.जी. मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या पवन गांधीचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याचे वडिल चैनसुख गांधी आणि त्यांच्या पत्नी गीता गांधी यांनी चॅरीटेबल ट्रस्ट स्थापन केली. पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर पिरंगुट नजिक सुतारवाडी इथं जागा घेऊन शाळा बांधली. सुरवातीला पवन ज्या शाळेत शिकला त्या लॉयला स्कूलनं शाळा चालवली पण नंतर तांत्रिक कारणामुळे ते पुढे चालवू शकले नाहीत. नंतर सिंहगड संस्थेचे मारूती नवले यांनी शाळा चालवायची तयारी दर्शवली आणि मार्च 2008 ते 2011 असा 35 महिन्यांचा करार केला. पण काही दिवसातच पवन गांधी चॅरीटेबल ट्रस्टने घातलेल्या अटी न पाळता मनमानी सुरू केली. चैनसुख गांधी यांनी करार न वाढवता शाळा दुसर्‍या कोणत्यातरी संस्थेला चालवायला देण्याचा निर्णय घेतला. पण नवलेंनी धमकावयला सुरुवात केली.विशेष म्हणजे नवले यांनी 35 महिन्यांचा करार संपायच्या आतच पवन गांधी चॅरीटेबल ट्रस्टच्या सदस्यांना विश्वासात न घेता कराराची मुदत 90 वर्ष वाढवली. एवढंच नाहीतर शाळेच्या बिल्डिंग व्यतिरिक्त रिकाम्या 11.5 एकर जमीन विकत घेतल्याचा खरेदीकरारही केला. ट्रस्टचे विश्वस्त असलेल्या बांधकाम व्यावसायिक रवी बराटे यांनी नवले यांनी विश्वसघात करून खोटी कागदपत्र बनवल्याची तक्रार पौड पोलीस ठाण्यात देऊन फौजदारी कारवाईची मागणी केली आहे. नवले यांना याविषयी विचारलं असता कॅमेर्‍यासमोर प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. तुम्हाला काय छापायचे ते छापा, दाखवायचे ते दाखवा अशी दर्पोक्तीही त्यांनी केली. वयाची सत्तरीपार केलेलं गांधी दांपत्य विश्वासघात आणि फसवणुकीनं अस्वस्थ आहे. आपल्या लाडक्या दिवंगत मुलाची स्मृती जपण्यासाठी गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे त्यांचे स्वप्न उद्‌ध्वस्त होताना पाहून ते हतबल झालेत. पोलीस कारवाई करायला टाळाटाळ करत आहे. शिक्षणसम्राट असलेले नवले धमकावत आहे. कोर्टात गेलं तर न्याय मिळायला किती वर्ष लागतील हे सांगता येत नाहीत म्हणून मीडियाद्वारे आपली व्यथा त्यांनी जगासमोर मांडली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2011 03:20 PM IST

सिंहगड इन्स्टिट्यूटने हडप केली 13 एकर जागा

अद्वैत मेहता पुणे

18 मे

सिंहगड इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा मारुती नवले यांनी 13 एकर जागा हडप केल्याचा आरोप पवन गांधी चॅरिटेबल ट्रस्टने केला आहे. खोटी कागपत्र सादर करून ही जागा हडप करण्यात आलीय.

या प्रकरणी गुंडांकडून धमक्या येत असल्याची तक्रार ट्रस्टने पोलिसात केली आहे. जून महिन्यात धर्मदाय आयुक्तांकडे या प्रकरणीची सुनावणी होणार आहे.

1987 ला पुण्यातला बी.जी. मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या पवन गांधीचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याचे वडिल चैनसुख गांधी आणि त्यांच्या पत्नी गीता गांधी यांनी चॅरीटेबल ट्रस्ट स्थापन केली.

पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर पिरंगुट नजिक सुतारवाडी इथं जागा घेऊन शाळा बांधली. सुरवातीला पवन ज्या शाळेत शिकला त्या लॉयला स्कूलनं शाळा चालवली पण नंतर तांत्रिक कारणामुळे ते पुढे चालवू शकले नाहीत.

नंतर सिंहगड संस्थेचे मारूती नवले यांनी शाळा चालवायची तयारी दर्शवली आणि मार्च 2008 ते 2011 असा 35 महिन्यांचा करार केला. पण काही दिवसातच पवन गांधी चॅरीटेबल ट्रस्टने घातलेल्या अटी न पाळता मनमानी सुरू केली.

चैनसुख गांधी यांनी करार न वाढवता शाळा दुसर्‍या कोणत्यातरी संस्थेला चालवायला देण्याचा निर्णय घेतला. पण नवलेंनी धमकावयला सुरुवात केली.

विशेष म्हणजे नवले यांनी 35 महिन्यांचा करार संपायच्या आतच पवन गांधी चॅरीटेबल ट्रस्टच्या सदस्यांना विश्वासात न घेता कराराची मुदत 90 वर्ष वाढवली. एवढंच नाहीतर शाळेच्या बिल्डिंग व्यतिरिक्त रिकाम्या 11.5 एकर जमीन विकत घेतल्याचा खरेदीकरारही केला.

ट्रस्टचे विश्वस्त असलेल्या बांधकाम व्यावसायिक रवी बराटे यांनी नवले यांनी विश्वसघात करून खोटी कागदपत्र बनवल्याची तक्रार पौड पोलीस ठाण्यात देऊन फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.

नवले यांना याविषयी विचारलं असता कॅमेर्‍यासमोर प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. तुम्हाला काय छापायचे ते छापा, दाखवायचे ते दाखवा अशी दर्पोक्तीही त्यांनी केली.

वयाची सत्तरीपार केलेलं गांधी दांपत्य विश्वासघात आणि फसवणुकीनं अस्वस्थ आहे. आपल्या लाडक्या दिवंगत मुलाची स्मृती जपण्यासाठी गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे त्यांचे स्वप्न उद्‌ध्वस्त होताना पाहून ते हतबल झालेत.

पोलीस कारवाई करायला टाळाटाळ करत आहे. शिक्षणसम्राट असलेले नवले धमकावत आहे. कोर्टात गेलं तर न्याय मिळायला किती वर्ष लागतील हे सांगता येत नाहीत म्हणून मीडियाद्वारे आपली व्यथा त्यांनी जगासमोर मांडली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2011 03:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close