S M L

वाघोबांच्या संख्यावाढीवरून तज्ञामध्ये वाद

18 मेभारतात वाघांची संख्या 16 टक्क्यांनी वाढल्याचे सरकारने जाहीर केले आहे. वाघांची संख्या 1411 वरून 1706 वर गेली आहे. असं पर्यावरण मंत्रालयाची आकडेवारीच सांगते. खर तर वन्यजीवप्रेमींसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. पण आता वाघांची हा संख्या खरी की खोटी, भारतातील वाघ खरंच वाढलेत का यावरून वाद निर्माण झाला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी वाघांची संख्या वाढल्याची घोषणा केल्यानंतर वन्यजीवप्रेमींना दिलासा मिळाला पण आघाडीचे व्याघ्रतज्ज्ञ उल्हास कारंथ यांनी या गणनेच्या पद्धतीबद्दलच प्रश्न उपस्थित केलेत. वाघांची संख्या कशी काय वाढू शकते असंही त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. उल्हास कारंथ यांनी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात ते म्हणतात.वाघांची संख्या चुकीची ?- जाहीर केलेल्या माहितीत वाघांच्या गणतीची प्रणाली सादर केली नाही. - नमुना म्हणून सर्वेक्षण केलेल्या अधिवासात वाघांची छायाचित्र, एखाद्या भागातली वाघांच्या संख्येची घनता मोजण्याची पद्धत ही माहितीही दिली नाही. - या अधिवासातल्या वाघांच्या संख्येवरून मोठ्या अधिवासातल्या वाघांच्या संख्येचा अंदाज कसा लावला तेही स्पष्ट केलं नाही.डॉ. उल्हास कारंथ यांनीच वाघांची गणना करण्यासाठीची कॅमेरा ट्रॅपिंग पद्धत शोधून काढली. त्यानंतर वाघांच्या पायांचे ठसे घेऊन गणना करण्याची अशास्त्रीय पद्धत बंद झाली. पण आता कॅमेरा ट्रॅपिंगची ही पद्धत योग्य रितीने राबवण्यात आलेली नाही. तरीही सरकार वाघांच्या वाढलेल्या जादूई आकड्यांपर्यंत सरकार कसं पोहोचलं असं त्यांनी विचारले आहे. उल्हास कारंथ म्हणतात, वाघांच्या अधिवासामध्ये 22 टक्क्यांची घट झाली आहे. असं यात म्हटलंय तर दुसरीकडे वाघांच्या घनतेत मात्र 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. असं नमूद करण्यात आलंय. पण हा निष्कर्ष काढण्यासाठी आपल्याकडे पुरेशी माहिती आहे असं मला वाटत नाही.राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने मात्र वाघांची संख्या योग्यच आहे असं म्हटलं आहे. उत्तराखंड, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये वाघांच्या घनतेत वाढ झाल्यामुळे हा आकडा वाढला आहे. व्याघ्रगणनेची माहिती जाहीर केलेली नाही असं म्हणता येणार नाही कारण पर्यावरण खात्याच्या वेबासाईटवर या अहवालातले मुद्दे दिलेले आहेत. डॉ. कारंथ आणि त्यांच्या सहकार्‍यांना फक्त त्यांनीच दिलेली माहिती मूलभूत वाटते. बाकीची माहिती ते दुय्यम दर्जाची मानतात. काही मुद्द्यांचीच आठवण करून देणाराच हा प्रकार आहे.व्याघ्रतज्ञामध्ये असा वाद असताना पर्यावरण मंत्रालय मात्र वाघांच्या संख्येबद्दल ठाम आहे. आणि वाघांच्या संख्येपेक्षा त्यांचे रक्षण आणि संवर्धनावर प्रयत्न करावेत असं बाकीच्या तज्ज्ञांचे म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2011 05:48 PM IST

वाघोबांच्या संख्यावाढीवरून तज्ञामध्ये वाद

18 मे

भारतात वाघांची संख्या 16 टक्क्यांनी वाढल्याचे सरकारने जाहीर केले आहे. वाघांची संख्या 1411 वरून 1706 वर गेली आहे. असं पर्यावरण मंत्रालयाची आकडेवारीच सांगते.

खर तर वन्यजीवप्रेमींसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. पण आता वाघांची हा संख्या खरी की खोटी, भारतातील वाघ खरंच वाढलेत का यावरून वाद निर्माण झाला आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी वाघांची संख्या वाढल्याची घोषणा केल्यानंतर वन्यजीवप्रेमींना दिलासा मिळाला पण आघाडीचे व्याघ्रतज्ज्ञ उल्हास कारंथ यांनी या गणनेच्या पद्धतीबद्दलच प्रश्न उपस्थित केलेत.

वाघांची संख्या कशी काय वाढू शकते असंही त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. उल्हास कारंथ यांनी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात ते म्हणतात.

वाघांची संख्या चुकीची ?

- जाहीर केलेल्या माहितीत वाघांच्या गणतीची प्रणाली सादर केली नाही. - नमुना म्हणून सर्वेक्षण केलेल्या अधिवासात वाघांची छायाचित्र, एखाद्या भागातली वाघांच्या संख्येची घनता मोजण्याची पद्धत ही माहितीही दिली नाही. - या अधिवासातल्या वाघांच्या संख्येवरून मोठ्या अधिवासातल्या वाघांच्या संख्येचा अंदाज कसा लावला तेही स्पष्ट केलं नाही.

डॉ. उल्हास कारंथ यांनीच वाघांची गणना करण्यासाठीची कॅमेरा ट्रॅपिंग पद्धत शोधून काढली. त्यानंतर वाघांच्या पायांचे ठसे घेऊन गणना करण्याची अशास्त्रीय पद्धत बंद झाली.

पण आता कॅमेरा ट्रॅपिंगची ही पद्धत योग्य रितीने राबवण्यात आलेली नाही. तरीही सरकार वाघांच्या वाढलेल्या जादूई आकड्यांपर्यंत सरकार कसं पोहोचलं असं त्यांनी विचारले आहे.

उल्हास कारंथ म्हणतात, वाघांच्या अधिवासामध्ये 22 टक्क्यांची घट झाली आहे. असं यात म्हटलंय तर दुसरीकडे वाघांच्या घनतेत मात्र 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. असं नमूद करण्यात आलंय. पण हा निष्कर्ष काढण्यासाठी आपल्याकडे पुरेशी माहिती आहे असं मला वाटत नाही.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने मात्र वाघांची संख्या योग्यच आहे असं म्हटलं आहे. उत्तराखंड, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये वाघांच्या घनतेत वाढ झाल्यामुळे हा आकडा वाढला आहे.

व्याघ्रगणनेची माहिती जाहीर केलेली नाही असं म्हणता येणार नाही कारण पर्यावरण खात्याच्या वेबासाईटवर या अहवालातले मुद्दे दिलेले आहेत. डॉ. कारंथ आणि त्यांच्या सहकार्‍यांना फक्त त्यांनीच दिलेली माहिती मूलभूत वाटते. बाकीची माहिती ते दुय्यम दर्जाची मानतात. काही मुद्द्यांचीच आठवण करून देणाराच हा प्रकार आहे.

व्याघ्रतज्ञामध्ये असा वाद असताना पर्यावरण मंत्रालय मात्र वाघांच्या संख्येबद्दल ठाम आहे. आणि वाघांच्या संख्येपेक्षा त्यांचे रक्षण आणि संवर्धनावर प्रयत्न करावेत असं बाकीच्या तज्ज्ञांचे म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2011 05:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close