S M L

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला कधीच विरोध नव्हता - शिवसेनाप्रमुख

19 मेमराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला आपला कधीच विरोध नव्हता असं स्पष्टीकरण बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा एकदा दिलं आहे. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आल्यानंतर नामांतराला शिवसेनेचा विरोध असल्याचे विरोधकांकडून सांगितलं जात होतं. त्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. मराठवाड्याची अस्मिता कायम ठेवून नामांतर करावे हेच आपलं मत होतं असं शिवसेनेनं काढलेल्या एका पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे. चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करण्यात येतेय असंही त्यांनी पत्रकात म्हटलं आहे. नामांतराचा विषय काढून काँग्रेस नवा वाद उकरून काढत आहे असा आरोपही शिवसेनाप्रमुखांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2011 12:46 PM IST

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला कधीच विरोध नव्हता - शिवसेनाप्रमुख

19 मे

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला आपला कधीच विरोध नव्हता असं स्पष्टीकरण बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा एकदा दिलं आहे. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आल्यानंतर नामांतराला शिवसेनेचा विरोध असल्याचे विरोधकांकडून सांगितलं जात होतं. त्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

मराठवाड्याची अस्मिता कायम ठेवून नामांतर करावे हेच आपलं मत होतं असं शिवसेनेनं काढलेल्या एका पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे. चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करण्यात येतेय असंही त्यांनी पत्रकात म्हटलं आहे. नामांतराचा विषय काढून काँग्रेस नवा वाद उकरून काढत आहे असा आरोपही शिवसेनाप्रमुखांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2011 12:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close