S M L

राही सरनोबतची ऑलिम्पिककडे झेप

19 मेकॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल्स पटकावणारी भारतीय नेमबाज राही सरनोबतच्या शिरात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. राहीने अमेरिकेत सुरू असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत ब्रॉंझ मेडल पटकावले आहे. तसेच लंडनला होणार्‍या ऑलिम्पिकसाठीही ती पात्र ठरली आहे. महिलांच्या 25 मी पिस्तुल स्पर्धेत तिने ही कामगिरी बजावली आहे. अशा प्रकारे ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरणारी ती सहावी भारतीय नेमबाज ठरली. राहीची ही सहावी वर्ल्डकप स्पर्धा आहे. फायनलमध्ये सुरूवातीला मागे पडलेल्या राहीने दमदार खेळ करत आठव्या स्थानावरून थेट तिसर्‍या स्थानावर धडक मारली. स्पर्धेत चीनची नेमबाज चेन यिंग हीनं गोल्ड तर मंगोलियन नेमबाज ओट्रावाद गुंदेगम्मा हीनं सिलव्हर मेडल पटकावले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2011 12:53 PM IST

राही सरनोबतची ऑलिम्पिककडे झेप

19 मे

कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल्स पटकावणारी भारतीय नेमबाज राही सरनोबतच्या शिरात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. राहीने अमेरिकेत सुरू असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत ब्रॉंझ मेडल पटकावले आहे.

तसेच लंडनला होणार्‍या ऑलिम्पिकसाठीही ती पात्र ठरली आहे. महिलांच्या 25 मी पिस्तुल स्पर्धेत तिने ही कामगिरी बजावली आहे. अशा प्रकारे ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरणारी ती सहावी भारतीय नेमबाज ठरली.

राहीची ही सहावी वर्ल्डकप स्पर्धा आहे. फायनलमध्ये सुरूवातीला मागे पडलेल्या राहीने दमदार खेळ करत आठव्या स्थानावरून थेट तिसर्‍या स्थानावर धडक मारली. स्पर्धेत चीनची नेमबाज चेन यिंग हीनं गोल्ड तर मंगोलियन नेमबाज ओट्रावाद गुंदेगम्मा हीनं सिलव्हर मेडल पटकावले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2011 12:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close