S M L

विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

23 मेसांगली जिल्ह्यातील बिराणवाडीमध्ये एकाच कुटुंबातील सातजणांना विषबाधा झाली आहे. यातील 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. बिरणवाडीच्या मोरे कुटुंबीयांनी रात्री जेवण केलं त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. घरच्या जेवणातून विषबाधा झाल्याचे सांगण्यात येतं आहे. तर अन्नामध्ये एन्डोसल्फाईन प्रकाराचे कीटकनाशक मिसळल्याने विषबाधा झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तर रात्री घरच्या जेवणात काहीच वेगळं केलं नसल्याचे मोरे कुटुंबीयांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या प्रकरणातील गूढ वाढत चाललं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 23, 2011 09:13 AM IST

विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

23 मे

सांगली जिल्ह्यातील बिराणवाडीमध्ये एकाच कुटुंबातील सातजणांना विषबाधा झाली आहे. यातील 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 जणांची प्रकृती गंभीर आहे.

बिरणवाडीच्या मोरे कुटुंबीयांनी रात्री जेवण केलं त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. घरच्या जेवणातून विषबाधा झाल्याचे सांगण्यात येतं आहे.

तर अन्नामध्ये एन्डोसल्फाईन प्रकाराचे कीटकनाशक मिसळल्याने विषबाधा झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तर रात्री घरच्या जेवणात काहीच वेगळं केलं नसल्याचे मोरे कुटुंबीयांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या प्रकरणातील गूढ वाढत चाललं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2011 09:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close