S M L

'रेडी'नंतर सलमान निर्माताच्या भूमिकेत

मिहीर त्रिवेदी , मुंबई 23 मेसध्या सलमान खान त्याच्या रेडी या सिनेमासाठी भलताच उत्सुक आहे. पण सलमानला दबंग या सिनेमाला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराविषयी विचारलं असता तितकी उत्सुकता त्याच्या बोलण्यातून जाणवली नाही. त्याचबरोबर सल्लूमियाँ लवकरच निर्मात्याच्या भूमिकेतही आपल्याला दिसणार आहे. एक नविन जॅकेट आणि हिर्‍यांनी सजवलेला गॉगल घालून सलामान खान तयार झाला आहे. तो त्याचा आगामी सिनेमा रेडीच्या प्रमोशन साठी. त्याने नुकतीच मुंबईत आपल्या चाहत्यांना भेट दिली. सिनेमाच्या प्रमोशन साठी एका म्युझिक कॉन्सर्टचं आयोजनही करण्यात आलं होतं. आता सगळी संध्याकाळच संगीताच्या नावे केली असताना सलमानेही सिनेमातल्या त्याच्या आवडत्या गाण्यावर ताल धरला. नुकतीच राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली आणि त्यात दबंग या सिनेमालाही पुरस्कार जाहीर झाला आहे. पण बॉलीवूडच्या या बॅड बॉयला मात्र शासनाने जाहीर केलेल्या त्या पुरस्काराची तितकीशी उत्सुकता नाही. असं असताना रेडी सोबतच सलमानला उत्सुकता आहे ते तो प्रोड्युस करत असलेल्या पहिल्या वहिल्या 'चिल्लर पार्टी 'या सिनोमाची. पण सध्या सलमानचे फॅन्स उत्सुक आहेत ते 3जूनला रिलीज होणार्‍या रेडी या सिनेमासाठी..

आईबीएन लोकमत | Updated On: May 23, 2011 10:33 AM IST

'रेडी'नंतर सलमान निर्माताच्या भूमिकेत

मिहीर त्रिवेदी , मुंबई

23 मे

सध्या सलमान खान त्याच्या रेडी या सिनेमासाठी भलताच उत्सुक आहे. पण सलमानला दबंग या सिनेमाला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराविषयी विचारलं असता तितकी उत्सुकता त्याच्या बोलण्यातून जाणवली नाही. त्याचबरोबर सल्लूमियाँ लवकरच निर्मात्याच्या भूमिकेतही आपल्याला दिसणार आहे.

एक नविन जॅकेट आणि हिर्‍यांनी सजवलेला गॉगल घालून सलामान खान तयार झाला आहे. तो त्याचा आगामी सिनेमा रेडीच्या प्रमोशन साठी. त्याने नुकतीच मुंबईत आपल्या चाहत्यांना भेट दिली.

सिनेमाच्या प्रमोशन साठी एका म्युझिक कॉन्सर्टचं आयोजनही करण्यात आलं होतं. आता सगळी संध्याकाळच संगीताच्या नावे केली असताना सलमानेही सिनेमातल्या त्याच्या आवडत्या गाण्यावर ताल धरला.

नुकतीच राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली आणि त्यात दबंग या सिनेमालाही पुरस्कार जाहीर झाला आहे. पण बॉलीवूडच्या या बॅड बॉयला मात्र शासनाने जाहीर केलेल्या त्या पुरस्काराची तितकीशी उत्सुकता नाही.

असं असताना रेडी सोबतच सलमानला उत्सुकता आहे ते तो प्रोड्युस करत असलेल्या पहिल्या वहिल्या 'चिल्लर पार्टी 'या सिनोमाची. पण सध्या सलमानचे फॅन्स उत्सुक आहेत ते 3जूनला रिलीज होणार्‍या रेडी या सिनेमासाठी..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2011 10:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close