S M L

एसएमएस कंपनीच्या 160 कामगारांचे काम बंद आंदोलन

23 मेसंपूर्ण मुंबईतील बायोवेस्ट डिस्पोज करणार्‍या एसएमएस कंपनीतल्या जवळपास 160 कामगारांनी आज काम बंद आंदोलन केलं. हॉस्पिटलमधून येणारा सगळा जैविक कचरा त्यांना उचलून आणावा लागतो, त्यासाठी मास्क, चांगले बूट आणि हातमोजे यांची गरज असते. पण यापैकी कुठलीही गरज पूर्ण केली जात नाही. उलट या सगळ्या गोष्टींची मागणी केली. तर आम्हाला कामावरुन काढून टाकतात असं या कामगारांचं म्हणणं आहे. अतिशय कमी उत्पन्नात हे कामगार काम करतात. कंपनीत मनसेची कामगार युनियन आहे. इथल्या कामगार नेत्यालाच या कामाचं कंत्राट देण्यात आलं आहे. 160 पैकी सहा कामगारांना कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे. मराठी माणसासाठी लढणारी मनसे आज मराठी कामगारांना त्यांची काही चूक नसताना कामावरुन काढतेय. आज कामबंद आंदोलन केल्यानंतर मराठी माणसासाठी काम करणारी मनसे अशी मराठी माणसाच्या विरोधात कशी वागू शकते असा जाब हे कामगार राज ठाकरे यांना विचारणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 23, 2011 03:15 PM IST

एसएमएस कंपनीच्या 160 कामगारांचे काम बंद आंदोलन

23 मे

संपूर्ण मुंबईतील बायोवेस्ट डिस्पोज करणार्‍या एसएमएस कंपनीतल्या जवळपास 160 कामगारांनी आज काम बंद आंदोलन केलं. हॉस्पिटलमधून येणारा सगळा जैविक कचरा त्यांना उचलून आणावा लागतो, त्यासाठी मास्क, चांगले बूट आणि हातमोजे यांची गरज असते.

पण यापैकी कुठलीही गरज पूर्ण केली जात नाही. उलट या सगळ्या गोष्टींची मागणी केली. तर आम्हाला कामावरुन काढून टाकतात असं या कामगारांचं म्हणणं आहे.

अतिशय कमी उत्पन्नात हे कामगार काम करतात. कंपनीत मनसेची कामगार युनियन आहे. इथल्या कामगार नेत्यालाच या कामाचं कंत्राट देण्यात आलं आहे. 160 पैकी सहा कामगारांना कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे.

मराठी माणसासाठी लढणारी मनसे आज मराठी कामगारांना त्यांची काही चूक नसताना कामावरुन काढतेय. आज कामबंद आंदोलन केल्यानंतर मराठी माणसासाठी काम करणारी मनसे अशी मराठी माणसाच्या विरोधात कशी वागू शकते असा जाब हे कामगार राज ठाकरे यांना विचारणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2011 03:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close