S M L

पाक हवाई तळावरील चकमक संपली ; 10 मृत्यू

23 मेओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर आता पाकिस्तानात अतिरेक्यांनी डोकं वर काढल्याचं आज सिद्ध झालं. ओसामा अबोटाबादमध्ये पाकिस्तानी मिलीटरी अकॅदमीजवळ मारला गेला होता. त्याचा बदला अतिरेक्यांनी कराचीतल्या पाकिस्तानी नौदलाच्या तळावर हल्ला करून घेतला. त्यात 10 कमांडोजचा मृत्यू झाला. तर 3 अतिरेकीही ठार झाल्याचे समजतं. अतिशय कडक सुरक्षा असलेल्या या नौदल तळावरची अतिरेक्यांविरोधातली कारवाई तब्बल 17 तासांनंतर संपली. पण यामुळे पाकिस्तानी सरकारचा दुबळेपणा आणि तिथली अराजकता उघड झाली.कराचीमधील पाकिस्तानच्या पीएनएस मेहरान नेव्हल बेसवर तालिबानी अतिरेक्यांच्या हल्ल्याविरोधातील कारवाई अखेर 17 तासानंतर संपली. पण त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागली. 10 ते 12 पाकिस्तानी कमांडो यात ठार झाले. तर अनेक जण जखमी झाले. किती दहशतवादी ठार झाले किंवा पकडले गेले याची नेमकी माहिती नाही. नेव्हल बेलवरचा हा अतिरेकी हल्ला खूपच मोठा होता. कडेकोट सुरक्षा असलेल्या या भागात रविवारी रात्री 10 वाजून 40 मिनिटांनी 10 अतिरेकी घुसले. आणि त्यांनी अमेरिकी बनावटीची दोन विमानं पेटवून दिली. हल्ल्याच्या ठिकाणी 24 बॉम्बस्फोटांचा आवाज ऐकू आल्याचं बोललं जातं आहे. तेहरिक ए तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ओसामा बिन लादेनच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचा दावा तालिबानने केला आहे. तालिबानची प्रतिक्रिया'ओसामा बिन लादेन ही व्यक्ती खूप महत्त्वाची होती. त्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आम्ही हजारो शत्रूंना ठार मारलं तरी ते पुरेसं नाही. आमचा बदला पूर्ण होईपर्यंत असे हल्ले सुरूच राहतील'दोन आठवड्यांपूर्वी अबोटाबादमध्ये मिलीटरी अकॅडमीच्या जवळच अमेरिकेच्या कारवाईत ओसामा बिन लादेन ठार झाला होता. आता अतिरेक्यांनी नेव्हल बेसवरच हल्ला चढवला. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराच्या क्षमतेबद्दल तिथल्या नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली. ओसामाच्या मृत्यूनंतर पाकिस्तान सरकार आणि लष्कराचा कमकुवतपणा तसेच दुटप्पी भूमिका जगासमोर आली आहे. त्यातच या हल्ल्यामुळे पाकिस्तानमधील अण्वस्त्रांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पाकचे पंतप्रधान गिलानी यांनी केला हल्ल्याचा निषेधपाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी आणि पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. या हल्ल्यामुळे दहशतवादाविरोधात लढण्याचा पाकिस्तानचा निर्धार ढासळणार नाही असं गिलानी यांनी म्हटलंय. या हल्ल्यानंतर कराचीमधील सर्व हॉस्पिटल्समध्ये आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान कराचीतल्या नौदलाच्या तळावर हल्ला होऊ शकतो याची पूर्वकल्पना पाकिस्तानी सुरक्षा संस्थांना होती अशीही चर्चा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 23, 2011 01:18 PM IST

पाक हवाई तळावरील चकमक संपली ; 10 मृत्यू

23 मे

ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर आता पाकिस्तानात अतिरेक्यांनी डोकं वर काढल्याचं आज सिद्ध झालं. ओसामा अबोटाबादमध्ये पाकिस्तानी मिलीटरी अकॅदमीजवळ मारला गेला होता. त्याचा बदला अतिरेक्यांनी कराचीतल्या पाकिस्तानी नौदलाच्या तळावर हल्ला करून घेतला.

त्यात 10 कमांडोजचा मृत्यू झाला. तर 3 अतिरेकीही ठार झाल्याचे समजतं. अतिशय कडक सुरक्षा असलेल्या या नौदल तळावरची अतिरेक्यांविरोधातली कारवाई तब्बल 17 तासांनंतर संपली. पण यामुळे पाकिस्तानी सरकारचा दुबळेपणा आणि तिथली अराजकता उघड झाली.

कराचीमधील पाकिस्तानच्या पीएनएस मेहरान नेव्हल बेसवर तालिबानी अतिरेक्यांच्या हल्ल्याविरोधातील कारवाई अखेर 17 तासानंतर संपली. पण त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागली.

10 ते 12 पाकिस्तानी कमांडो यात ठार झाले. तर अनेक जण जखमी झाले. किती दहशतवादी ठार झाले किंवा पकडले गेले याची नेमकी माहिती नाही. नेव्हल बेलवरचा हा अतिरेकी हल्ला खूपच मोठा होता.

कडेकोट सुरक्षा असलेल्या या भागात रविवारी रात्री 10 वाजून 40 मिनिटांनी 10 अतिरेकी घुसले. आणि त्यांनी अमेरिकी बनावटीची दोन विमानं पेटवून दिली. हल्ल्याच्या ठिकाणी 24 बॉम्बस्फोटांचा आवाज ऐकू आल्याचं बोललं जातं आहे.

तेहरिक ए तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ओसामा बिन लादेनच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचा दावा तालिबानने केला आहे.

तालिबानची प्रतिक्रिया'ओसामा बिन लादेन ही व्यक्ती खूप महत्त्वाची होती. त्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आम्ही हजारो शत्रूंना ठार मारलं तरी ते पुरेसं नाही. आमचा बदला पूर्ण होईपर्यंत असे हल्ले सुरूच राहतील'

दोन आठवड्यांपूर्वी अबोटाबादमध्ये मिलीटरी अकॅडमीच्या जवळच अमेरिकेच्या कारवाईत ओसामा बिन लादेन ठार झाला होता. आता अतिरेक्यांनी नेव्हल बेसवरच हल्ला चढवला. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराच्या क्षमतेबद्दल तिथल्या नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली. ओसामाच्या मृत्यूनंतर पाकिस्तान सरकार आणि लष्कराचा कमकुवतपणा तसेच दुटप्पी भूमिका जगासमोर आली आहे. त्यातच या हल्ल्यामुळे पाकिस्तानमधील अण्वस्त्रांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

पाकचे पंतप्रधान गिलानी यांनी केला हल्ल्याचा निषेध

पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी आणि पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. या हल्ल्यामुळे दहशतवादाविरोधात लढण्याचा पाकिस्तानचा निर्धार ढासळणार नाही असं गिलानी यांनी म्हटलंय.

या हल्ल्यानंतर कराचीमधील सर्व हॉस्पिटल्समध्ये आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान कराचीतल्या नौदलाच्या तळावर हल्ला होऊ शकतो याची पूर्वकल्पना पाकिस्तानी सुरक्षा संस्थांना होती अशीही चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2011 01:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close