S M L

बियाणासाठी शेतकर्‍यांना मोजावी लागते 50 टक्के रक्कम जादा

23 मेकापसाच्या बियाण्याच्या मुद्यावरुन आता राजकीय पक्षांनीही आंदोलनास सुरुवात केली आहे. जळगावला बियाण्यांचा होत असलेला काळाबाजार आणि रासायनिक खतांची कृत्रीम टंचाई या मुद्यावरुन शिवसेनेनं कृषी अधिकार्‍यांना धारेवर धरलं. कापसाची लागवड करण्याची वेळ आली तरी बाजारात असलेला बियाणांचा तुटवडा आणि व्यापार्‍यांंकडून होत असलेली लूट यामुळे शेतकरी अत्यंत चिंताग्रस्त झाले आहेत. काळाबाजारात 200 ते 250 रुपये जास्त भावाने बियाणं घेत असतांना कराव्या लागणार्‍या लिकींगमुळे बियाणांसाठी अतिरिक्त 50 टक्के रक्कम शेतकर्‍याला मोजावी लागतेय. नेमका हाच मुद्दा पकडून शिवसेनेनं आता शेतकर्‍यांची बाजू घेतली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 23, 2011 03:27 PM IST

बियाणासाठी शेतकर्‍यांना मोजावी लागते 50 टक्के रक्कम जादा

23 मे

कापसाच्या बियाण्याच्या मुद्यावरुन आता राजकीय पक्षांनीही आंदोलनास सुरुवात केली आहे. जळगावला बियाण्यांचा होत असलेला काळाबाजार आणि रासायनिक खतांची कृत्रीम टंचाई या मुद्यावरुन शिवसेनेनं कृषी अधिकार्‍यांना धारेवर धरलं.

कापसाची लागवड करण्याची वेळ आली तरी बाजारात असलेला बियाणांचा तुटवडा आणि व्यापार्‍यांंकडून होत असलेली लूट यामुळे शेतकरी अत्यंत चिंताग्रस्त झाले आहेत.

काळाबाजारात 200 ते 250 रुपये जास्त भावाने बियाणं घेत असतांना कराव्या लागणार्‍या लिकींगमुळे बियाणांसाठी अतिरिक्त 50 टक्के रक्कम शेतकर्‍याला मोजावी लागतेय. नेमका हाच मुद्दा पकडून शिवसेनेनं आता शेतकर्‍यांची बाजू घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2011 03:27 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close