S M L

मेधा पाटकर यांचे उपोषण सुरूच ; उपचाराला नकार

24 मेमुंबईत महानगरपालिकेच्या कारवाईमध्ये तोडल्या गेलेल्या झोपड्यांच्या विरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचे उपोषण सलग 5 व्या दिवशीही सुरूच आहे. गोळीबार नगरातील गणेश कृपा सोसायटीमधल्या 17 झोपड्या तोडण्यात आल्या आहे. त्याविरोधात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. कालपासून मेधा पाटकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना ताप आणि उलट्यांचा त्रास होतोय. तरीही त्या उपोषणाच्या ठिकाणीच आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं नाही. डॉक्टरांनी त्यांना उपचाराचा सल्ला दिला. पण त्यांनी उपचाराला नकार दिला आहे. दरम्यान, काल गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी यासंदर्भातील कागदपत्रं मागवून घेतली. पण त्यांनी कोणतंही ठोस आश्वासन दिलेलं नाही. त्यामुळे मेधाताई आणि रहिवासी आपापल्या भूमिकेवर ठाम आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2011 08:41 AM IST

मेधा पाटकर यांचे उपोषण सुरूच ; उपचाराला नकार

24 मे

मुंबईत महानगरपालिकेच्या कारवाईमध्ये तोडल्या गेलेल्या झोपड्यांच्या विरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचे उपोषण सलग 5 व्या दिवशीही सुरूच आहे.

गोळीबार नगरातील गणेश कृपा सोसायटीमधल्या 17 झोपड्या तोडण्यात आल्या आहे. त्याविरोधात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे.

कालपासून मेधा पाटकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना ताप आणि उलट्यांचा त्रास होतोय. तरीही त्या उपोषणाच्या ठिकाणीच आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं नाही. डॉक्टरांनी त्यांना उपचाराचा सल्ला दिला. पण त्यांनी उपचाराला नकार दिला आहे.

दरम्यान, काल गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी यासंदर्भातील कागदपत्रं मागवून घेतली. पण त्यांनी कोणतंही ठोस आश्वासन दिलेलं नाही. त्यामुळे मेधाताई आणि रहिवासी आपापल्या भूमिकेवर ठाम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2011 08:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close