S M L

एपीआयच्या जागेवर उभारले विनापरवानगी निवासी संकुल

25 मेआयबीएन लोकमतने उघडकीस आणलेल्या औरंगाबादेतील एपीआय जमीन घोटाळ्यात आता आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एपीआयच्या जागेवर निवासी संकुल उभारताना हरे रामा हरे कृष्णा सोसायटीने प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि राज्याच्या पर्यावरण विभागाकडून परवानगीच घेतलेली नाही. त्यामुळे नियम आणि कायदा पायदळी तुडविल्याचंही एपीआय जमीन गैरव्यवहारातून स्पष्ट झालं आहे.औरंगाबादच्या एपीआय कंपनीच्या जागाविक्रीचं प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे. औद्योगिक वसाहतीत किंवा अन्य ठिकाणीही वीस हजार चौरस मीटरपेक्षा अधिक बांधकाम करण्यासाठी राज्याच्या पर्यावरण खात्याची परवनागी आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाचे नाहरकरत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. असे असूनही हरे रामा हरे हरे कृष्णा सोसायटीने ब्लू बेल या वसाहतीच बांधकाम कोणतीही परवानगी न घेता सुरू केले आहे. आयबीएन लोकमतकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रानूसार ब्लू बेल्स सोसायटीसाठी तब्बल पाच एकर जागेवर वीस हजार चौरस फुटापेक्षाही जास्त बांधकाम केले जात आहे. त्यासाठी पर्यावरण खात्याची परवानगी घेतलेली नाही आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाने प्रोझोन मॉलशिवाय अन्य कोणत्याही बांधकामाला नाहरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. त्यामुळे ब्लु बेलचे बांधकामच अनधिकृत ठरते. यावर आता राज्य सरकार काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.विभागीय प्रदुषण नियंत्रण अधिकारी अनिल मोहेकर म्हणतात, वीस हजार चौरस मीटर पेक्षा अधिक बांधकाम असेल तर पर्यावरण विभागाची परवानगी आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाची कन्सेंट घ्यावी लागते. प्रोझोन मॉलशिवाय आमच्याकडे कोणीही परवानागी मागितलेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2011 11:11 AM IST

एपीआयच्या जागेवर उभारले विनापरवानगी निवासी संकुल

25 मे

आयबीएन लोकमतने उघडकीस आणलेल्या औरंगाबादेतील एपीआय जमीन घोटाळ्यात आता आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

एपीआयच्या जागेवर निवासी संकुल उभारताना हरे रामा हरे कृष्णा सोसायटीने प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि राज्याच्या पर्यावरण विभागाकडून परवानगीच घेतलेली नाही. त्यामुळे नियम आणि कायदा पायदळी तुडविल्याचंही एपीआय जमीन गैरव्यवहारातून स्पष्ट झालं आहे.

औरंगाबादच्या एपीआय कंपनीच्या जागाविक्रीचं प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे. औद्योगिक वसाहतीत किंवा अन्य ठिकाणीही वीस हजार चौरस मीटरपेक्षा अधिक बांधकाम करण्यासाठी राज्याच्या पर्यावरण खात्याची परवनागी आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाचे नाहरकरत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.

असे असूनही हरे रामा हरे हरे कृष्णा सोसायटीने ब्लू बेल या वसाहतीच बांधकाम कोणतीही परवानगी न घेता सुरू केले आहे. आयबीएन लोकमतकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रानूसार ब्लू बेल्स सोसायटीसाठी तब्बल पाच एकर जागेवर वीस हजार चौरस फुटापेक्षाही जास्त बांधकाम केले जात आहे.

त्यासाठी पर्यावरण खात्याची परवानगी घेतलेली नाही आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाने प्रोझोन मॉलशिवाय अन्य कोणत्याही बांधकामाला नाहरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. त्यामुळे ब्लु बेलचे बांधकामच अनधिकृत ठरते. यावर आता राज्य सरकार काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विभागीय प्रदुषण नियंत्रण अधिकारी अनिल मोहेकर म्हणतात, वीस हजार चौरस मीटर पेक्षा अधिक बांधकाम असेल तर पर्यावरण विभागाची परवानगी आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाची कन्सेंट घ्यावी लागते. प्रोझोन मॉलशिवाय आमच्याकडे कोणीही परवानागी मागितलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2011 11:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close