S M L

मराठवाड्याला मान्सूनपूर्व पावसाचा फटका ; 6 जणांचा मृत्यू

26 मेमराठवाड्यात पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाने सहाजणांचा मृत्यू झाला आहे. मराठवाड्याच्या बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठं नुकसान झालं आहे. औरंगाबादसह जालना, परभणी, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडला. लातूर बीड आणि हिंगोली जिल्ह्यातही पाऊस झाला. तर जालना जिल्हयातील परतूरमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. हिंगोली आणि नांदेड जिल्हयातही दोन जण दगावले. तर लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यात दोघांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. वीज पडल्याने काही ठिकाणी जनावरंही मृत्यूमुखी पडली आहे. मराठवाड्यात काल रात्रीच पावसाला सुरूवात झाली. पावसाच्या पहिल्याच दणक्याने औरंगाबादमधला वीजपुरवठा सहा तास खंडीत झाला. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात पावसाचा जोर जास्त होता. परभणी जिल्ह्यात सरासरी 14 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यात वीज पडून एका शेतकर्‍याचा कापूस जळून खाक झाला तर तीन जनावरांचा मृत्यू झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 26, 2011 09:19 AM IST

मराठवाड्याला मान्सूनपूर्व पावसाचा फटका ; 6 जणांचा मृत्यू

26 मे

मराठवाड्यात पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाने सहाजणांचा मृत्यू झाला आहे. मराठवाड्याच्या बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठं नुकसान झालं आहे.

औरंगाबादसह जालना, परभणी, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडला. लातूर बीड आणि हिंगोली जिल्ह्यातही पाऊस झाला. तर जालना जिल्हयातील परतूरमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.

हिंगोली आणि नांदेड जिल्हयातही दोन जण दगावले. तर लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यात दोघांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. वीज पडल्याने काही ठिकाणी जनावरंही मृत्यूमुखी पडली आहे.

मराठवाड्यात काल रात्रीच पावसाला सुरूवात झाली. पावसाच्या पहिल्याच दणक्याने औरंगाबादमधला वीजपुरवठा सहा तास खंडीत झाला. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात पावसाचा जोर जास्त होता.

परभणी जिल्ह्यात सरासरी 14 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यात वीज पडून एका शेतकर्‍याचा कापूस जळून खाक झाला तर तीन जनावरांचा मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2011 09:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close